Marathi Biodata Maker

चाळिशीनंतरची तंदुरुस्ती

Webdunia
सोमवार, 7 जानेवारी 2019 (08:39 IST)
चाळिशीनंतर महिलांची चयापचय क्रिया मंदवते. त्यामुळे या वयोगटातल्या महिलांनी आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवं. चाळिशीतील महिलांनी आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. तसंच चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यासाठी व्यायामही करायला हवा. चाळिशीनंतर आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबतच्या काही टिप्स... 
 
चाळिशीनंतर महिलांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. या वयात त्यांच्या चयापचय क्रियेचा वेगही मंदावतो. पण विविध धान्यांच्या सेवनानं या दोन्हींचा सामना करणं शक्य होतं. खरं तर तिशीनंतरच टप्प्याटप्यानं चयापचय क्रिया मंदवण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पांढरा ब्रेड किंवा पांढरा भात याऐवजी महिलांनी ब्राउन राईस, व्हिट ब्रेड किंवा ओट्स खायला पाहिजे. यामुळे शरीराला फायबर मिळेल. फायबरमुळे वजन वाढण्याला प्रतिबंध होतो आणि वजन कमी व्हायलाही मदत होते. 
 
आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा. सॅलेड, कोशिंबिरी हासुद्धा फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. पालक, गाजर, काकडी, टॉमेटो, संत्री, स्ट्रॉबेरी अशा पदार्थांचं सेवनही महत्त्वाचं ठरतं. 
 
फायबरबरोबर पोटॅशियम, क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. यामुळे त्वचा चांगली राहते व सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव होतो. 
 
आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करायला हवं. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहतं आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्याबरोबर किडनी, धमन्या, हृदय, मेंदू यांनाही धोका पोहचू शकतो. 
 
चाळिशीनंतर मधुमेहाचा धोका वाढतो. शक्यतो साखर आणि गोड पदार्थ टाळावेत. साखर जास्त प्रमाणात खाल्यानं वयस्कर दिसू लागता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

ट्राय करा जांभूळ शरबत; स्वादिष्ट तर आहेच, शिवाय अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात

Chocolate Lovers लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ; चॉकलेट बर्फी

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत

भारतीय सैन्य CDM भरती २०२६: १०वी ते १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

अंगातून घामाचा वास घालवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाका

पुढील लेख
Show comments