Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्य टिप्स : निरोगी राहण्यासाठी 8 टिप्स

Webdunia
शनिवार, 13 मार्च 2021 (09:00 IST)
1  भरपूर पाणी प्या-
निरोगी राहण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे की सकाळी उठून किमान 3 ते 4 ग्लास पाणी प्यावे. सकाळी लवकर उठून ब्रश न करता 3 ते 4 ग्लास कोमट पाणी प्या .असं केल्याने आपल्या शरीरातील विषारी टॉक्सिन बाहेर निघून जातील. या मुळे आपण निरोगी राहता.लक्षात ठेवा की पाणी प्यायल्यावर आपल्याला 45 मिनिटे काहीच खायचे नाही.
 
2 दररोज व्यायाम करा-  
सकाळी किमान 20 मिनिटे तरी व्यायाम करावे. असं केल्याने आपण दिवसभर ऊर्जावान आणि आनंदी अनुभवाल.
 
3 सकाळची न्याहारी- 
सकाळच्या न्याहारीसाठी मोड आलेले कडधान्य, एक तरी हंगामी फळ आणि काही सुकेमेवे खावे. प्रयत्न करा की न्याहारी 8 वाजे पर्यंत घेतलीच पाहिजे. आपण ताजे फळाचे ज्यूस देखील घेऊ शकता. 
 
4 जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका-
जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने जठारअग्नी कमी होते.अन्न पचत नाही.म्हणून जेवण्याच्या  किमान 45 मिनिटा नंतर पाणी प्यावे. पाणी कोमट असेल तर अधिकच चांगले. 
 
5 निरोगी राहण्यासाठी जेवण केल्यावर किंवा अंघोळीच्या पूर्वी आणि झोपण्याच्या पूर्वी लघवी करून झोपावे. या मुळे शारीरिक तापमान सामान्य होतो.आणि झोपण्यापूर्वी लघवी केल्याने झोप चांगली येते.
 
6 साखर घेऊ नका- 
साखर घेणे बंद करा. किंवा कमी करा. साखर बंद करणे शक्य नसेल तर मध, खडीसाखर, गूळ वापरा. मिठाचे प्रमाण देखील कमी करा. मीठ देखील सेंधव वापरा. 
 
7 ध्यान करा- 
ध्यान करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. सकाळी आणि संध्याकाळी किमान 15 मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे. या मुळे आपली सर्व काळजी आणि तणाव नाहीसे होतात. आणि आपण निरोगी आणि आनंदी अनुभवता.
 
8 पुरेशी झोप घ्या -
झोप पूर्ण न झाल्याने देखील अनेक रोग होतात. संपूर्ण दिवस खराब होतो. अस्वस्थता जाणवते. किमान 6 -8 तासाची झोप तरी घेतली पाहिजे. या मुळे शरीराला आराम मिळतो. आणि आपण ऊर्जावान अनुभवतो.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

प्रेरणादायी कथा : शूर योद्धा रुद्रसेनची गोष्ट

Sweet Dish : सोनपापडी रेसिपी

जागतिक उच्च रक्तदाब दिन 2025: उच्च रक्तदाब म्हणजे काय, त्याचा इतिहास आणि थीम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments