निरोगी राहण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावयाची असते. आपल्याला सर्दी, पडसं, घसादुखी सारख्या त्रासाला सामोरी जावं लागू नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणे करून आपण अश्या त्रासांपासून वाचू शकतो.
आपण सर्दी पडसं सारख्या आजारांना आधीच सावधगिरी बाळगून वेळच्यावेळी थांबवू शकतो. चला तर मग कोणत्या गोष्टी कराव्यात हे जाणून घेऊया....
रोग प्रतिकारकशक्ती- आपणं निरोगी होऊ इच्छित असल्यास सर्वात पहिली अट अशी आहे की आपल्याला आपली रोग प्रतिकारक शक्ती बळकट करावी लागणार. या साठी आपल्याला आपल्या आहारामध्ये फळ आणि भाज्यांचा समावेश करावा लागणार. त्याचबरोबर आपल्या दैनंदिनी मध्ये योगाचा ही समावेश करायला हवा.
तुळस आणि आलं - सकाळच्या चहाची सुरुवात तुळस आणि आलं घालून करावी. हे आपल्या घशाच्या सर्व त्रासांना तसेच सर्दी दूर करण्यासाठी उपर्युक्त ठरते. नियमानं ह्याचे सेवन करावे.
हळदीचे दूध - दररोज रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध पिण्याची सवय लावायला हवी. हे आपल्याला सर्दीच्या त्रासांपासून लांब तर ठेवणारच त्याचबरोबर आपल्या रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील मदत करेल.
कोमट पाणी - फ्रीजचे पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी. ही सवय आपला घसा स्वच्छ ठेवण्यास मदत करेल.