Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मध : दररोज योग्य प्रमाणात वापरा, आरोग्य आणि तारुण्य टिकवा

मध : दररोज योग्य प्रमाणात वापरा, आरोग्य आणि तारुण्य टिकवा
, गुरूवार, 21 जानेवारी 2021 (08:39 IST)
मध हे प्रत्येक वयाच्या लोकांना पसंत असतं. मुलं दुधात मध टाकून पिणे पसंत करतात तर तरुण आणि वयस्कर लोक वजन कमी करण्यासाठी मधाचा उपयोग करतात. मधाचे सेवन केल्याने स्टॅमिना वाढतो सोबतच तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. अनेक रूपात याचे सेवन वेगवेगळे फायदे देतात.
 
जर मधात आढळणाऱ्या पोष्टिकतेची गोष्ट केली तर एक चमचा मधात 64 कॅलरी आणि 17 ग्राम साखर असते. यात ग्लुकोज आणि सुक्रोज देखील सामील असतं तसेच यात फायबर फॅट्स प्रोटीन असतं.
 
चांगल्या गुणवत्ता असलेल्या मधात अनेक महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट असतात ज्याने हार्ट अटॅक आणि काही प्रकाराचे कर्करोगाचा धोका कमी करण्यात मदत होते. हृदयाच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी मध घेणे योग्य ठरू शकतो. अनेक लोकांसाठी मध हे साखरेच्या अपेक्षा एक चांगले पर्याय आहे. तरी याचा वापर औषधाप्रमाणे करावा.
 
हाय ब्लडप्रेशर असणार्‍या लोकांना हृदयाचे आजार होण्याचा धोका असतो. मध हा धोका कमी करण्यास मदत करतं कारण यात एंटीऑक्सीडेंट तत्त्व आढळतात. 
 
या प्रकारे करा सेवन 
खोकला बरा करण्यासाठी दिवसातून एकदा एक चमचा मधाचे सेवन करावे.
घशात खवखव असल्यास मध एखाद्या गरम पेय पदार्थात मिसळून घेतल्याने चांगले परिणाम मिळतात. एक कप चहा किंवा एक कप गरम पाण्यात एक चमचा मध मिसळून पिण्याने घशाची खवखव या पासून आराम मिळतो आणि रोग प्रतिकार क्षमता देखील वाढते.
चांगली झोप यावी यासाठी हर्बल चहात मध मिसळून प्यावे.
मुलांना टोस्ट किंवा पॅन केकवर मध घालून द्यावे याने स्वाद वाढेल आणि अधिक कॅलरीपासून सुटका मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

असं का होतं,जाणून घ्या