suvichar
✕

निद्रानाशाच्या त्रासापासून मिळवा सुटका! रात्री गाढ आणि चांगली झोप येण्यासाठी सोपे उपाय

Webdunia
सोमवार, 28 सप्टेंबर 2026 (07:00 IST)
Health care Tips :बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, कधीकधी काही लोकांना तणाव, चिंता,असते त्यामुळे चांगली झोप येत नाही. काही जण रात्रभर जागेच असतात. झोपण्यापूर्वी चुकीच्या सवयीमुळे निद्रानाशाचा त्रास होतो.
ALSO READ: साजूक तुपात भाजलेला मखाना रोज खा; शरीराला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
निद्रानाश म्हणजे काय ?
काही लोकांना लवकर झोप येत नाही, काहींना गाढ झोप येत नाही आणि काहींना रात्रभर झोप येत नाही. या दिनचर्येमुळे झोप कमी होते. या मुळे आरोग्याच्या अनेक समस्या उदभवतात.हे काही उपाय अवलंबवून तुम्ही निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या. 
ALSO READ: अचानक होणारी तीव्र डोकेदुखी दुर्लक्षित करू नका! ब्रेन ॲन्युरिझमची लक्षणे, कारणे आणि उपाय जाणून घ्या
1. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हात, चेहरा आणि पाय धुवा. असे केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
 
2.  दिवसा किंवा रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे सेवन करू नका.
 
3. झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्यानेही मन शांत आणि स्थिर राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो, ज्यामुळे झोप चांगली लागते.
 
4. चिमूटभर जायफळ दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे झोप चांगली येण्यासही मदत होते.
ALSO READ: औषधांशिवाय आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे घरगुती उपाय करा
5. तुम्ही ही श्वासोच्छ्वासाची युक्ती देखील वापरून पाहू शकता, यासाठी तुम्हाला चार सेकंद नाकातून श्वास घ्यावा लागेल, नंतर तो सात सेकंद धरून ठेवावा आणि आठ सेकंद सोडत राहा. असे केल्याने हृदयाची धडधड मंदावते आणि मेंदूमध्ये एक रसायन सोडले जाते, ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

कार्तिकी एकादशीनिमित्त खास नैवेद्याच्या पारंपारिक पाककृती Kartiki Ekadashi Naivedyam

मधुमेहाचे निदान करण्यासाठी कोणत्या ४ रक्त चाचण्या कराव्यात? जाणून घ्या महत्त्व

रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर

National Naturopathy Day 2026 औषधांशिवाय निरोगी राहण्याचा निसर्गाचा राजमार्ग; जाणून घ्या महत्त्व आणि फायदे

केसांना एरंडेल तेल लावण्याचे फायदे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments