Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

व्हॅसलिनचे 15 आश्चर्यकारक फायदे

व्हॅसलिनचे 15 आश्चर्यकारक फायदे
, मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (09:59 IST)
हिवाळ्यात आपण व्हॅसलिन वापरतच असाल. त्वचे आणि ओठांसाठी हे फायदेशीर तर आहेच आणि बऱ्याच प्रकारे हे व्हॅसलिन उपयुक्त आहे. त्याचे 15 आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या जे आपल्याला माहीत नसणार.
 
1 याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वचेची काळजी घेणं. हे आपल्या त्वचेला रुक्ष होण्यापासून वाचवत आणि त्वचेला मऊ ठेवतं.
 
2 ओठांवर व्हॅसलिनचा वापर केल्यानं फाटलेल्या ओठांपासून आराम मिळतो, तसेच याला स्ट्रॉबेरी किंवा इतर फळांच्या गीरासह मिसळून आपण घरच्या घरात नैसर्गिक लिपबाम देखील तयार करू शकता. जे आपल्या ओठांना मऊ आणि गुलाबी ठेवण्यास मदत करतं.
 
3 व्हॅसलिन आपल्या रुक्ष कोपऱ्यांच्या भेगा ठीक करण्यास मदत करतं आणि काळे झालेले कोपरे देखील स्वच्छ करतो. फक्त रुक्ष झालेल्या कोपऱ्यांना व्हॅसलिन लावा आणि रुक्षपणा दूर करा.
 
4 जर आपण कोठे बाहेर जात आहात, तर कोपरे, गुडघे आणि तळपायाच्या मागील भागास व्हॅसलिन लावा. या मुळे काळ्या रेषा लपतील आणि चमक वाढेल.
 
5 जर आपल्याला आपल्या पापण्या लांब आणि सुंदर दाखवायचे असल्यास, थोडंसं व्हॅसलिन, आपली ही इच्छा देखील पूर्ण करेल. हे लावल्या नंतर आपल्या पापण्या सुंदर आणि चमकदार दिसतील.
 
6 आपल्याला आपल्या शरीरावर परफ्यूमचा सुवास टिकवून ठेवायचा असल्यास आपण आपल्या मनगटावर आणि गळ्यावर परफ्यूमसह थोडंसं व्हॅसलिन लावून चोळा. बस झाले आपले काम. आता आपल्या परफ्यूमचा सुवास बऱ्याच काळ दरवळत राहील.
 
7 एखाद्या लग्न समारंभात जात असल्यास, तुटलेले आणि दोन तोंडी केस लपविण्यासाठी व्हॅसलिन हे चांगले उपाय आहे. याला दोन्ही हाताने चोळून हळुवार हाताने आपल्या केसांना लावा. हे लावल्यावर केसांना चमक येईल.
 
8 जुने जोडे नवे बनविण्यात व्हॅसलिन आपली मदत करू शकतो. थोडंसं व्हॅसलिन आपल्या जोडांना घासून लावा आणि मग बघा, आपले शूज नव्या सारखे दिसतील.
 
9 व्हॅसलिन आपण मेकअप रिमूव्हर प्रमाणे देखील वापरू शकता. आपले मेकअप स्वच्छ करण्यासाठी थोडंसं व्हॅसलिन लावून याला कापसाने स्वच्छ करा आणि चेहरा धुऊन घ्या. या मुळे आपली त्वचा मऊ होईल.
 
10 शरीराच्या कोणत्या भागाला किंवा नखाचा जवळची कातडी ओढली गेली असल्यास व्हॅसलिन लावून आपण त्वचेला एक सारखं करू शकता.
 
11 केसांना कलर करताना, हेयर लाइन जवळ चांगल्या प्रमाणे व्हॅसलिन लावा. या मुळे डाय आपल्या त्वचेवर लागणार नाही आणि आपली त्वचा देखील संरक्षित राहील.
 
12 शेव्हिंग केल्यावर चेहऱ्यावर व्हॅसलिनचा वापरा, त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करतं आणि रुक्षपणा देखील नाहीसा होतो. या शिवाय हे आपल्या चेहऱ्याची चमक देखील वाढवतो.
 
13 जर आपल्याला अंघोळीचा आनंद खरंच घ्यावयाचा असल्यास, व्हॅसलिन मध्ये थोडंसं मीठ घाला आणि शरीरावर मॉलिश करा, नंतर कोमट पाण्याने अंघोळ करा. आपण स्वतःला अधिक ताजे तवाने अनुभवाला.
 
14 कानातले घालताना सहजपणे कानात जात नसल्यास, तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. बस थोडंसं व्हॅसलिन लावा आणि सहजपणे कानातले घाला.
 
15 जर आपण आयशॅडो किंवा ब्लशरचा वापर पावडर सारखं करून कंटाळला असल्यास, आणि आपल्याला क्रीमीशेड हवा असल्यास, तर आपल्याला एवढेच करायचे आहे की जुन्या आयशॅडो किंवा ब्लशरमध्ये व्हॅसलिन मिसळा. घ्या क्रीमीशेड तयार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कापलेला कांदा लगेच वापरा, फ्रीजमध्ये ठेवणे धोकादायक