Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वजन कमी करण्यासाठी डाईट मध्ये सहभागी करा ब्रोकोली, जाणून घ्या फायदे

Webdunia
बुधवार, 15 मे 2024 (08:00 IST)
ब्रोकोली एक पौष्टिक भाजी आहे. जी अनेक आरोग्यदायी लाभांनी परिपूर्ण आहे. वजन कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. जर तुम्ही तुमचे वजन कमी करत असाल तर तुमच्या डाईट मध्ये ब्रोकोली नक्कीच सहभागी करा. 
 
1. ब्रोकोली मध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असते. केवळ एक कप मध्ये 31 कॅलरी असते यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. ब्रोकोलीच्या सेवन मुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. 
 
2. ब्रोकोली मध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि फोलेट सारखे अनेक महत्वाचे पोषक तत्वे असतात. तसेच ब्रोकोली व्हिटॅमिन A, पोटॅशियम, फायबरचा देखील एक चांगला स्रोत आहे. हे पोषक तत्वे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असतात. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 
 
3. ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम कमी असते. जे एक असे खनिज आहे जे तुमच्या मेटाबॉलिज्मला चालना देते. 
 
4. ब्रोकोलीमध्ये 90% प्रतिशद पाणी असते. जे तुम्हाला हाइड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते. हाइड्रेटेड राहणे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे असते. 
 
5. ब्रोकोली एक बहुमुखी भाजी आहे. जिला अनेक प्रकारे शिजवले जाते. ब्रोकोलीला तुम्ही कच्चे किंवा स्टीम्ड, वाफवलेली, भाजलेली किंवा सॉटेड खाऊ शकतात. तसेच तुम्ही ब्रोकोलीला सूप, स्टु,कॅसरोल सोबत मिक्स करून खाऊ शकतात. 
 
ब्रोकोली वजन कमी करण्यासाठी उत्तम स्रोत आहे. तुमच्या डाईट मध्ये ब्रोकोली नक्कीच सहभागी करा. ही चविष्ट, पौष्टिक भाजी वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत करते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

नवरात्रीच्या काळात या उपयुक्त वॉटरप्रूफ मेकअप टिप्सचा अवलंब करा

मोबाईल रेडिएशनमुळे शरीराला हानी होऊ शकते, फोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

यामुळे शरीरात पक्षाघात होतो! तुम्ही या चुका करत आहात का?

काजू-किशमिश पुलाव रेसिपी

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments