Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

International yoga day 2020 : फुफ्फुसांना बळकट करतात योगाच्या या 4 टिप्स, 7 नियम

International yoga day 2020 : फुफ्फुसांना बळकट करतात योगाच्या या 4 टिप्स, 7 नियम
, रविवार, 21 जून 2020 (06:20 IST)
कोरोना व्हायरसच्या काळात फुफ्फुसांना बळकट ठेवणे गरजेचे आहे. योग आणि प्राणायाम केल्याने आपण फुफ्फुसांना बळकट ठेवू शकतो. प्राणायामाने जिथे आपली फुफ्फुसे बळकट होतात तिथेच शरीराचे इतर अवयव देखील निरोगी राहतात. चला जाणून घेऊया फुफ्फुसांना स्वच्छ आणि बळकट करण्यासाठीच्या काही टिप्स 
 
1 भस्त्रिका प्राणायाम : भस्त्रिकाचा शाब्दिक अर्थ आहे फुंकणे किंवा भाता. एक असा प्राणायाम ज्यामध्ये लोहाराच्या फुंकणी सारखी आवाज करीत वेगाने शुद्ध प्राणवायू आत नेतात आणि अशुद्ध वायू बाहेर फेकतात. सिद्धासन किंवा सुखासनामध्ये बसून कंबर, मान आणि मणक्याला ताठ ठेवून मनाला स्थिर ठेवा. डोळे मिटून घ्या. नंतर उच्च वेगाने श्वास घ्या, आणि तसेच वेगाने बाहेर सोडा. श्वास घेताना पोट फुगले पाहिजे. आणि श्वास सोडताना पोट दबले पाहिजे. असे केल्याने बेंबीवर दाब पडतो. हे प्राणायाम चांगल्या प्रकारे शिकून निव्वळ 30 सेकंदात करता येते.
खबरदारी : भ्रस्त्रिका प्राणायाम करण्याचा आधी आपल्या नाकाला पूर्णपणे स्वच्छ करा. भ्रस्त्रिका प्राणायाम सकाळी मोकळ्या आणि स्वच्छ वार्‍यात करायला हवे. क्षमतेपेक्षा जास्त हा प्राणायाम करू नये. दिवसातून एकदाच हा प्राणायाम करायला हवा. जर कोणाला काही आजार असल्यास त्यांनी योग शिक्षकाला विचारूनच प्राणायाम करावे.
 
2 वज्रोली मुद्रा : पूर्ण रेचन करून श्वास थांबवावे. जो पर्यंत श्वास सुरळीत होत नाही वारंवार वज्रनाडीचे आकुंचन करा आणि सोडा. लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर (जननेंद्रियाच्या पाठी) केंद्रित असावं
 
3 वायू भक्षण : वाऱ्याला जाणीवपूर्वक घशातून अन्न नलिकेत घेणे. वायू त्वरित ढेकर म्हणून परत येईल. वारं गिळताना घशावर जोर पडतो आणि अन्न नलिकेतून वारं पोटा पर्यंत जाऊन परत येतं.
 
4 पूर्ण भुजा शक्ती विकास क्रिया : सर्वात आधी ताठ उभे राहून दोन्ही पाय एकत्र करावं. हात सरळ ठेवा, खांदे मागे ओढून छातीला ताणा. या नंतर उजव्या हाताचा अंगठा आत आणि बोटं बाहेर ठेवून मूठ बांधून घ्यावी. मग डाव्या हाताच्या तळ भाग मांडीजवळ ठेवा. श्वास भरताना उजवा हात खांद्यासमोर आणा. श्वास घेऊन हात डोक्यावर घेऊन जा. श्वास सोडा आणि उजव्या तळहाताला खांद्याचा मागून खाली घेऊन जा. अश्या प्रकारे एक चक्र पूर्ण होईल. आता उजव्या हाताने सलग 10 वेळा गोल हात फिरवा आणि डाव्या हाताची मूठ बनवून 10 वेळा गोल फिरवा. शेवटी, हळू हळू श्वास सामान्य करा. श्वासोच्छ्वास सामान्य झाल्यावर दोन्ही हातांची मूठ बनवून 10 वेळा समोराहून मागे घेऊन जावे. या वेळेस श्वासाची एकाग्रता आणि तोल राखून ठेवा. हाताला एका दिशेमध्ये गोल फिरवल्यावर उलट दिशेने देखील फिरवायचे आहे. जेणे करून योगाचे संचलन देखील होतं, जे की आवश्यक आहे. 
 
फायदे : 
1 वज्रोली क्रिया प्रजनन प्रणाली ला बळकट करते. आणि लैंगिक आजारामध्ये देखील फायदेशीर आहे. 
2 वायू भक्षण क्रिया अन्न नलिकेला शुद्ध आणि बळकट करते यामुळे फुफ्फुसे देखील शुद्ध आणि बळकट बनतात.
3 भ्रस्त्रिका प्राणायामातून शरीराला जास्त प्रमाणात प्राणवायू मिळतो. जेणे करून हे शरीराच्या सर्व अवयवांमधील दूषित पदार्थ काढून फुफ्फुसे बळकट करतात. ह्याचे बरेच फायदे आहे. 
4 पूर्ण भुजा शक्ती विकासक क्रियाने फुफ्फुसांची कार्य क्षमता वाढते यामुळे जीवनशक्तीची पातळी वाढते. व्यक्ती दिवसभर तंदुरुस्त राहतो. ह्याचा नियमित सरावामुळे बाहूंचे स्नायू बळकट होतात. खांद्याचा कडकपणा दूर होतो. ह्याचा नियमित सरावामुळे शरीरातील सर्व अवयवांमध्ये जीवनशक्ती संचारते.
 
इतर नियम : 
1 जेथे प्रदूषित वातावरण असेल तेथे केवली प्राणायाम करावं आणि त्या प्रदूषित वातावरणांपासून सुटण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सोबत रुमाल ठेवत असल्यास केवली प्राणायामाची गरज नाही. योग्य स्वच्छ, स्वच्छ आणि पुरेपूर हवेच्या सेवनाने सर्व प्रकाराचे आजार आणि मानसिक ताण दूर होतं आणि दीर्घायुष्य होतं.
2 वास टाळावे. त्याच प्रकारे ज्या प्रकारे आपण खराब अन्न घेण्यावाचून टाळतो. सुवासिक अत्तर किंवा स्प्रे वापरा. श्वासाच्या दुर्गंधासाठी आयुर्वेदाचा उपचार घेऊ शकता.
3 रोग, द्वैत, किंवा नकारात्मक भाव दरम्यान दोन्ही नाकातून श्वास पूर्ण शक्तीने बाहेर काढून हळू-हळू पोटापर्यंत श्वास घ्या असे किमान 5 वेळा करा.
4 आपल्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्या की ती असंतुलित किंवा अनियंत्रित तर नाही त्याला सामान्य करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम करा.
5 पाच सेकंदापर्यंत दीर्घ श्वास घेऊन ती फुफ्फुसामध्ये भरा आणि 10 सेकंद रोखून ठेवा. 10 सेकंदांनंतर तो पर्यंत बाहेर ठेवा जो पर्यंत आपले पोट आत पाठीकडे खेचले जाईल. 
6 नाकाचे छिद्र नेहमी स्वच्छ ठेवा. इच्छित असल्यास जलनेती किंवा सुतनेतीची मदत घेऊ शकता. 
7 सुवास देखील एक नैसर्गिक अन्न आहे. वेळोवेळी सर्व प्रकारांच्या सुवासाचा वापर करून मन आणि शरीरात ऊर्जेचा संचार करता येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुक लाइव्हद्वारे होणार योगदिन साजरा