Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही 11 लक्षणे आढळल्यास किडनी निकामी होण्याची लक्षणे असू शकतात

kidney related problems symptoms
, गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (11:38 IST)
शरीरातील कोणत्याही समस्येकडे दुर्लक्षित करू नये कारण कदाचित ही समस्या एखाद्या आजाराचे कारण बनू शकतं. विशेषतः किडनीच्या बाबतीत तर सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे, कारण किडनीच्या आजाराचे सुरुवातीस लक्षात आले नाही तर ते प्राणघातक होऊ शकतं. 
 
आकडेवारीत सिद्ध झाले आहे की या किडनीच्या किंवा मूत्रपिंडाच्या आजाराने सर्वात अधिक कोणी ग्रस्त आहे तर त्या बायका आहे. म्हणून त्यांना अधिक जागरूक आणि सावध राहण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊ या त्या संकेतांबद्दल, जे आपले शरीर आपल्याला किडनीचा आजार होण्याचं दर्शवतात.
 
* प्रत्येक वेळी कमकुवत पण जाणवणं.
* जास्त थकवा जाणवणं.
* शरीरात ऊर्जेचा अभाव. खरं तर जेव्हा मूत्रपिंड किंवा किडनी व्यवस्थितरीत्या काम करत नाही, तेव्हा माणसाचे शरीर या प्रकारचे संकेत देतात, ज्यांना वेळेत ओळखणे आवश्यक आहे.
* वारंवार लघवी लागणे.
* रात्री बऱ्याच वेळा लघवीला जाणं. जर आपल्याला देखील अश्याच प्रकारांची तक्रार असल्यास त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
* जर आपल्याला एकाएकी आपली त्वचा रुक्ष वाटत असल्यास. त्वचेमध्ये जळजळ आणि खाज येत असल्यास याला सहजच घेऊ नका.
* शरीराचे वजन एकाएकी वाढणे.
* शरीरावर सूज येणं. हे आपली किडनी योग्य प्रकारे काम न करण्याचे संकेत देखील असू शकतात. अश्या परिस्थितीत आपल्याला त्वरितच डॉक्टरांचा सल्ला  घ्यावा.
* उन्हाळ्यात देखील जास्त थंडी वाजते.
* झोप येत नाही.
* अधिक तहान लागणे. 
किडनीच्या या समस्या आढळल्यास दुर्लक्षित करू नका, नाही तर मग पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळा येऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लिपिक पदाच्या 2500 पेक्षा अधिक जागा, 6 नोव्हेंबर पर्यंत त्वरा अर्ज करा