Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Benefits of eucalyptus oil निलगिरी तेलाचे फायदे जाणून घ्या

Benefits of eucalyptus oil निलगिरी तेलाचे फायदे जाणून घ्या
, मंगळवार, 18 जुलै 2023 (23:23 IST)
Benefits of eucalyptus oil निलगिरीचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सूज कमी करण्यात हे उपयोगी आहे. केसांची गळती देखील दूर होते. याचे फायदे जाणून घ्या. 
 
1  सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर- सूज आणि वेदना कमी करण्यासाठी आपण निलगिरी तेल वापरू शकता. या तेलात अँटी इंफ्लिमेंट्री आणि इनॉलजेसिक मिश्रण असतात. हे कोणत्याही प्रकारची वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या साठी वेदना असलेल्या भागात दिवसातून एक किंवा दोन वेळा मॉलिश करा. वेदना आणि सूज नाहीशी होईल. 
 
2 माऊथवॉश करा- हे तेल दात आणि हिरड्यांच्या समस्येसाठी प्रभावी मानले आहे. या तेलात अँटी-ऑक्सिडंट तोंडातील असलेल्या संसर्गजन्य जंताना नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने जंत तोंडात उद्भवत नाही. या साठी आपण पेस्टमध्ये मिसळून देखील ब्रश करू शकता. 
 
3 सर्दी -पडसं साठी फायदेशीर -बदलत्या हंगामात सर्दी पडसं होणं सामान्य आहे. परंतु आपल्याला सर्दी पडसं जास्त प्रमाणात होत असेल तर हे तेल वापरावे. या मध्ये अँटीइंफ्लिमेंट्री,अँटिसेप्टिक गुणधर्म आढळतात. या साठी कोमट पाण्यात एक ते दोन थेंब तेलाचे घालून गुळणे केल्याने घशातील खवखव नाहीशी होते आणि  या तेलाने मॉलिश केल्याने वेदना कमी होते. या तेलाची वाफ देखील घेतल्याने सर्दी पडसं मध्ये आराम होतो. 
 
4 मुरुमांना दूर करतो- निलगिरी तेल मुरुमांनाच नव्हे तर त्वचेच्या समस्या देखील दूर करतो. जळजळ कमी करणे, जखम बरी करणे, या साठी हे तेल उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त त्वचेचे संसर्ग कमी करण्यासाठी देखील हे तेल फायदेशीर आहे.  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marath Kavita नानाविध इच्छा मनी उत्पन्न होतात