जर आपल्याला वजन वाढणे टाळायचे असेल आणि कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल तर, जेवल्यानंतर 10 ते 30 मिनिट चालणे आवश्यक आहे.
जेवणानंतर, चालणे नेहमीच शरीरासाठी फायदेशीर असे म्हटले जाते.संशोधनात आढळून आले आहे की आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार आपण जेवणानंतर 10 ते 30 मिनिटांपर्यंत चालणे योग्य आहे या मुळे कॅलरी जळतात आणि वजन वाढत नाही आणि कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. जेवणानंतर चालणे का महत्त्वाचे आहे जाणून घ्या
1 पचन चांगले राहते- जेवल्यानंतर चालण्यामुळे पचन चांगले होते या मागील कारण असे की चालण्याने शरीराची हालचाल होते तेव्हा आतड्यांमधील अन्न लवकर पचते.
2 रक्तातील साखर नियंत्रणात राहते- जेवल्यानंतर चालल्याने शरीराची हालचाल केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
3 वजन वाढत नाही-तज्ज्ञ म्हणतात की, जेवणानंतर चालल्यामुळे कॅलरी जळतात आणि त्यामुळे वजन वाढत नाही. जास्त मसाले युक्त अन्न खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका होऊ शकतो. म्हणून मसालेयुक्त आणि जास्त तेलकट अन्न खाणे टाळा.
4 रक्तदाब वाढत नाही- जेवल्यानंतर चालण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.लक्षात ठेवा की चालताना आपला वेग जास्त असू नये.
5 हृदयरोगाचा धोका कमी होतो- जेवल्यानंतर चालल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.