Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम व्यायाम शंखनाद, आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम व्यायाम शंखनाद, आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
, शुक्रवार, 21 मे 2021 (09:53 IST)
हिंदू धर्मात शंखनाद पराम्‍परा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु आपल्याला माहित आहे का शंख वाजवल्याने आरोग्याला देखील फायदा होता. शंखनाद केल्याने फुफ्फुसांना मजबूती मिळते आणि सोबतच त्याची कार्यक्षमता वाढते. शंखनाद फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. जाणून घ्या शंख वाजवण्याचे आरोग्यासाठी फायदे-
 
फुफ्फुस मजबूत बनवा
कोरोना कालावधीत तज्ञ फुफ्फुसांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यास सल्ला देत आहेत. नाक आणि तोंडातून होत कोरोना व्हायरस सर्वात आधी आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमवर हल्ला करतो. फुफ्फुसाची शक्ती वाढविण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी शंख वाजवण्याने फायदा होऊ शकतो. असे म्हटले जाते की वृद्ध लोक दररोज शंख वाजवत होते, म्हणून त्यांचे फुफ्फुस म्हातारपणातसुद्धा खूप मजबूत असयाचे. दररोज 2-5 मिनट शंख वाजवणे योग्य ठरेल. 
 
शंख वाजवल्याने वातावरणात उपस्थित जीवाणू दूर होतात
जेव्हा आपण शंख फुंकता तेव्हा त्यातून निघणारा ध्वनी आसपासच्या वातावरणामधील हवा शुद्ध करतो. तसेच वातावरणात असलेल्या जीवाणूमुळे रोग होण्याची शक्यता कमी करते.
 
शंखात पाणी पिण्याचे फायदे 
जर आपण रात्रभर शंखच्या आत पाणी सोडून आणि ते पाणी सकाळी प्यायल्याने त्वचेचे आजार, अॅलर्जी, पोटदुखी इत्यादी त्रास दूर होतात.
 
डोळे होतात मजबूत
जर आपण ड्राय आय सिंड्रोम, सूज, डोळ्यातील इंफेक्शन इतर डोळ्याच्या आजारामुळे त्रस्त असाल तर अशात रात्रभर शंखात पाणी भरुन ठेवावे आणि सकाळी उठल्यावर त्या पाण्याने डोळे धुऊन घ्यावे सोबतच उजवीकडे-डावीकडे फिरवावे. 3-4 वेळा हा उपाय केल्याने आराम मिळतो.
 
त्वचेसाठी योग्य
शंखात नैसर्गिक कॅल्शियम, सल्फर आणि फॉस्फरस आढळतात. अशा परिस्थितीत रात्री शंख पाण्याने भरुन ठेवून नंतर सकाळी त्याचे सेवन केल्याने बोलण्यातील अडचण दूर होते आणि हाडे व दात मजबूत होतात. शंखाच्या पाण्याने मालिश केल्याने त्वचेसंबंधी आजार देखील दूर होतात. या व्यतिरिक्त अॅलर्जी, पुरळ, पांढरे डाग देखील काढले जातात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्युकर मायकोसिस किंवा काळी बुरशी म्हणजे काय? काळजी कशी घ्यावी, उपचार काय आहेत?