कानात मळ साचणे ही सामान्य बाब आहे. ही सर्वांसह होते.वेळोवेळी कानाची स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे. स्वच्छता न झाल्यास कान दुखणे, खाज होणे,जळजळ होणे, किंवा बहिरेपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात.
कान स्वच्छ करण्यासाठी या टिप्स जाणून घ्या.
1गरम पाणी - कापसा च्या साहाय्याने पाणी कोमट करून कानात घाला. कान थोडा काळ तसाच राहू द्या आणि काही सेकंदांनंतर, कान उलट करा आणि पाणी बाहेर काढा. कान स्वच्छ करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे.
2 तेल- ऑलिव, शेंगदाणा किंवा मोहरीच्या तेलात थोडासा लसूण घालून तळून घ्या . आता हे तेल कोमट असल्यास ते कापसाच्या साहाय्याने कानात घालून कान झाकून ठेवा. असं केल्याने कानाची घाण सहजपणे बाहेर येईल.
3 कांद्याचा रस- कांदा शिजवून किंवा तळून घेऊन रस काढा. आता ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कांद्याच्या रसातील काही थेंबा कानात घाला. हे कानातील घाण सहजपणे बाहेर काढेल.
4 मिठाचे पाणी -गरम पाण्यात मीठ मिसळून घोळ तयार करा. आता या घोळा चे काही थेंब कापसाच्या मदतीने कानात घाला आणि नंतर कान उलट करून घ्या. परंतु हे लक्षात ठेवा की कान दुखणे किंवा कोणत्याही खरुज आणि जखमा झाल्यास ही पद्धत अवलंबू नका.