Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Low blood pressure लक्षणे, कारणे आणि त्यावर घरगुती उपचार

Low blood pressure लक्षणे, कारणे आणि त्यावर घरगुती उपचार
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (09:41 IST)
उच्च रक्तदाब एक सामान्य आरोग्य समस्या आहे ज्या बद्दलची माहिती सर्वानाच असते. परंतु रक्तदाब कमी होणं देखील आरोग्यास धोकादायक आहे. कमी रक्तदाबामुळे हृदय, मेंदू आणि इतर महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो, चक्कर येणं किंवा मळमळणे या सारख्या समस्या उद्भवतात. अचानक रक्तदाब कमी होणं आपल्यासाठी अडचणी आणू शकतात. रक्तदाबात कमी त्याच परिस्थितीत होते जेव्हा एखादी व्यक्ती बसण्याच्या किंवा झोपण्याच्या स्थितीतून अचानक उठते. याला पोस्टरल हायपोटेन्शन असे म्हणतात. यामुळे चक्कर येतात आणि आपल्याला जडपणा वाटू शकतो. या स्थितीचा सामना करण्यासाठी आपण काही उपाय अवलंबवू शकता. चला तर मग यांचा बद्दल जाणून घेऊ या.
 
* कॅफिन घ्या -
आरोग्य तज्ज्ञांचा मते, जर आपले रक्तचाप एकाएकी कमी झाले असल्यास, अशा परिस्थितीत आपण चहा किंवा कॉफी सारखे कॅफिन सारखे पेयपदार्थ घ्यावे. हे आपल्या रक्तदाबाला तात्पुरती वाढण्यास मदत करतं. एकाएकी बीपी कमी झाल्यास एक कप कॉफी घेतल्यास आपल्याला निश्चितच आराम मिळेल.
 
* द्रव्य पदार्थ जास्त घेणे -
आरोग्य तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ असे सांगतात, की कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आहारात द्रव्य पदार्थांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्याला दिवसातून किमान 2 ते 3 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. या शिवाय आपण नारळ पाणी आणि इतर निरोगी पेय पदार्थ देखील आपल्या आहारात समाविष्ट करावं. हे आपल्या शरीरातील द्रव्य पदार्थाना तसेच बनवून राखण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स देतात. निर्जलीकरण हे कमी रक्तदाब असण्याचे सामान्य कारण आहे.
* तुळशीची पाने चावा-
आहारतज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना कमी रक्तदाब असण्याची म्हणजेच लो बीपी असण्याची तक्रार असते, त्यांनी सकाळी उठून पाच -सात तुळशीची पाने चावून चावून खावी. वास्तविक तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी उच्च प्रमाणात असते, जे आपल्या रक्तदाबाला नियंत्रित करण्यास मदत करते. हे युजेनॉल नावाच्या अँटीऑक्सीडंटने देखील भरलेले असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करते.
 
* हे उपाय करावे-
आपणास कमी रक्तदाबाचा त्रास असल्यास हे उपाय आपल्यासाठी खूप प्रभावी आहे.
आपण अधिक काळ उपाशी राहणे टाळावे.
दोन आहाराच्या मध्ये पौष्टिक आणि निरोगी स्नॅकिंग घ्यावी.
एका दिवसात 3 वेळा मोठे आहार घेण्यापेक्षा 5 वेळा लहान लहान आहार घ्या.
हे आपल्या रक्तदाबाला कमी होण्यास प्रतिबंधित करेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यात मिश्र धान्याने बनलेल्या पोळया खा आणि 5 फायदे जाणून घ्या