पिस्त्यामध्ये भरपूर पोषक असतात. जाणून घेऊया त्याचे फायदे-
पिस्त्यामध्ये फॅटी अॅसिडसारखे अनेक फायटोकेमिकल्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पिस्त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे कॅरोटीनॉइड्स असतात, जे डोळ्याच्या रेटिनासाठी फायदेशीर असतात.
पिस्ता हे अमीनो ऍसिडचा चांगला स्रोत आहे, जे केसांसाठी आवश्यक आहे.
टाईप 2 मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेवर पिस्त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.
पिस्त्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म जळजळ दूर करण्यासाठी काम करू शकतात.
पिस्त्यात फ्लेव्होनॉइड्स देखील असतात, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
पिस्ता केमो प्रतिबंधक आहे. यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकतात.
पिस्त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.
पिस्त्याचे सेवन केल्याने शरीरात पुरेशा प्रमाणात लोह मिळते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढू शकते.