जर तुम्हाला उदासपणा जाणवत असेल तर हे पदार्थ सेवन करणे टाळावे.
अल्कोहोलचे सेवन हे स्ट्रेस आणि ड्रिपेशन समस्या निर्माण करते.
मीट मध्ये संतृप्त वसाची मात्रा अधिक असते.
पांढरा ब्रेड सेवन केल्याने वजन वाढते आणि मेंदु प्रभावित होतो.
Foods that cause depression आजच्या धावपळीच्या जीवनात 'मानसिक आरोग्यची समस्या अधिक प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे चिंता, तणाव आणि नैराश्य सारख्या समस्या वाढल्या आहे. चुकीची जीवनशैली आणि चुकीची जेवण पद्धती मुळे 'मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच विटामिनची कमी, जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन, व्यायाम न करणे तसेच धूम्रपानचे सेवन केल्यामुळे मेंदुवर नकारात्मक प्रभाव पडत आहे.
'मानसिक आरोग्य हा असा आजार आहे जो पटकन लक्षात येत नाही जर तुम्हाला अधिक तणाव किंवा चिंता होत असेल तर यांचे लक्षण शरीरात लगेच दिसत नाही. तसेच जर यांचे लक्षण दिसायला लागले तर आपण यांना साधा त्रास समजून दुर्लक्ष करतो. 'मानसिक आरोग्याला चांगले ठेवण्यासाठी चांगले जेवण करणे आहे. कारण आपण जे खातो तसाच प्रभाव आपल्या मेंदुवर पडतो. चला जाणून घेऊ या 'मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून कुठले पदार्थ सेवन करणे टाळावे.
1. अल्कोहोल- अल्कोहोल ला जरी तुम्ही आनंदाचे सोबती मानत असाल पण दुःखाचे सोबती पण हे आहेत. याचे सेवन तुमच्या तंत्रिका तंत्रावर प्रभाव टाकतो आणि त्याच्या गतीला संथ करतो ज्यामुळे बऱ्याचदा आनंदात पण उदासपणा जाणवतो.
2. मीट- खासकरून लाल रंगाचे आणि डब्बा बंद मांस हे खूप अपायकारक असते. यात संतृप्त वसाची मात्रा अधिक प्रमाणात असते. जे इंसुलिनच्या स्तरात बदलाव करतात. याच्या दुष्परिणाममुळे केवळ उदासपणाच नाही तर अनेक गंभीर आजारांची शक्यता वाढते.
3. पांढरा ब्रेड- संशोधनात असे आढळून आले आहे की पांढऱ्या ब्रेडमध्ये असलेल्या कार्बोहाइड्रेटची अत्याधिक मात्रा महिलांमध्ये उदासपणाचे कारण बनू शकते या मुळे थकवा पण येऊ शकतो. तसेच याच्या सेवनाने वजन वाढते याचा सेवनाने मेंदुमध्ये आळस आणि तणाव निर्माण करतो.
4- कॉफी- कॉफी ही थकवा दूर करून ऊर्जा देण्यात सहाय्यक आहे पण यात असलेले कॅफीन तुमच्या झोपेवर परिणाम करतात. ज्यामुळे मानसिक थकवा आणि उदासपणा यांचा सामना करावा लागतो तसेच चिंताग्रस्त पीडित व्यक्तींनी कॉफी घेणे टाळावे.
5. भात- भाताचे अधिक सेवन पण उदासीचे कारण बनू शकते. यात रिफाइंड कार्बोहाइड्रेट असते, जे हार्मोन बदलवून शरीराच्या ग्लाइसेमिक सूचकांक ला प्रभावित करते, आणि उदासपणा जाणवतो.
Edited By- Dhanashri Naik