Publish Date: Sat, 25 Feb 2023 (18:15 IST)
Updated Date: Sat, 25 Feb 2023 (17:45 IST)
आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण डायटिंग करत असाल आणि त्यासाठी सलॅडचे अधिक सेवन करत असाल तर सावध व्हा. कारण सॅलडनेही वजन वाढू शकतं. हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे.
तशी ही गोष्ट सर्व प्रकाराच्या सलॅडवर लागू होत नाही, परंतू अनेकदा आपण स्वादिष्ट आणि चटपटीत सलॅडचा मजा घेण्याच्या फिराकीत वजन वाढवता.
बाहेर जेवायला गेल्यावर आपण आपल्या आवडीचे मेयोनीज आणि क्रीमने भरपूर सलॅडची चव बघता आणि व्हेज सिझलरच्या नावावर भरपूर सॉसही सेवन करता. परंतू या प्रकाराचे सलॅड कॅलरीने भरपूर असतात आणि वजन कमी करण्याऐवजी वाढवू शकतात.
याव्यतिरिक्त अनेक रेस्टॉरन्टध्ये सर्व्ह करण्यात येणार्या सलॅडची गार्निशिंगमध्ये असे पदार्थ वापरले जातात जे कॅलरीने भरपूर असतात आणि चव देण्यासह सपाट्याने आपले वजन वाढवण्यात हातभार लावतात.
म्हणून सलॅडचे सेवन करताना ते फ्रेश, आणि विना कॅलरीयुक्त असावे याची काळजी घ्या.