चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण स्वच्छतेची काळजी घेतली तर जंतूंचा संसर्ग टाळू शकतो. आपण सर्व आपल्या घराच्या आणि स्वयंपाकघराच्या स्वच्छतेची खूप काळजी घेत असतो. परंतु आपल्या मायक्रोव्हेवच्या स्वच्छतेकडे लक्षच दिले जात नाही. असं केल्याने हे आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. बऱ्याच काळ मायक्रोव्हेवची स्वच्छता झाली नसेल तर हे जंतांचे घर होऊ शकतात.
चला तर मग जाणून घेऊ या काही असे सोपे टिप्स ज्यांना अवलंबवून आपण आपल्या मायक्रोव्हेव्हची चांगल्या प्रकारे स्वच्छता करू शकता.
*सर्वप्रथम मायक्रोवेव्ह मधून रॅक, ग्रिल आणि टिन काढून साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवा. या मुळे या वस्तूंवर साचलेली घाण सहजपणे काढता येईल.
* हे चांगल्या प्रकारे ब्रश ने घासून स्वच्छ पाण्याने धुऊन वाळण्यासाठी ठेवावं.
* आता पाण्यात बेकिंग सोडा, मीठ, आणि लिंबू मिसळून घोळ तयार करा. या घोळात कापड बुडवून मायक्रोव्हवची आतून स्वच्छता करा.
* एका बादलीत साबणाचे पाणी तयार करा. या पाण्याने ब्रशच्या साहाय्याने मायक्रोव्हेव मध्ये जमलेले डाग घासून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.
* आता मायक्रोव्हेव वरून स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि त्या पाण्याने वरून स्वच्छ करा.