स्ट्रॉबेरी फारच आकर्षक दिसते त्यामुळे पाहताक्षणीच खावीशी वाटते. आंबट-गोड चवीचं हे फळ थंडीच्या दिवसात मिळतं. स्ट्रॉबेरीचा आकार लहान असला तरी आरोग्याच्या दृष्टीने ती फारच गुणकारी आहे. स्ट्रॉबेरी हे मेंदूचं खाद्य असल्याचं एका संशोधनातूनही समोर आली आहे. भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्याने स्ट्रॉबेरीच्या सेवनाने मेंदूची क्षमता वाढते. इतर अनेक रोगांवरही हे फळ उपयुक्त ठरतं. जर जाणून घेऊ स्ट्रॉबेरीचं आपल्या आहारातील महत्त्व .......
दिवसाला ती ते चार स्ट्रॉबेरी खाल्लयाने स्मरणशक्ती तसंच एकाग्रचा वाढायला मदत होते.
स्ट्रॉबेरी हे पोटॅशियम आणि 'क' जीवनसत्वाने समृद्ध फळ आहे. हे दोन्ही घटक तुम्हाला उत्साही ठेवण्यात मदत करतात.
वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या पडतात. पण स्ट्रॉबेरीमुळे या सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
हार्मोन्सचं संतुलन तसंच हाडांच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरीचा आहारात समावेश करायला हवा.
शरीरावर आलेली सूज स्ट्रॉबेरीच्या सेवनाने कमी होते.
कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमता स्ट्रॉबेरीत आहे.
गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त आहे.
केस आणि त्वचा या दोन्हीचं आरोग्य राखण्यातही स्ट्रॉबेरी महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये स्ट्रॉबेरीच्या तत्वांचा वापर केला जातो.
स्ट्रॉबेरीतील काही गुणधर्मांमुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून केस आणि त्वचा यांचं रक्षण होऊ शकतं.
यातले अँटीऑक्सिडंट्स केसांसाठी लाभदायक ठरतात. या अँटीऑक्सिडंट्समुळे केसांना मुळांपासून पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात.