जुने प्लॉस्टिकचे डबे
जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.
शिळं अन्न
फ्रीज अन्न खराब होऊ देत नसलं तरी जास्त दिवस फ्रीजमध्ये अन्न ठेवू नये. यात बॅक्टीरिया पसरायला लागतात. हे बॅक्टीरिया एका आठवड्यात लाखोंच्या संख्येतदेखील पोहचू शकतात.
एअर फ्रेशनर
एअर फ्रेशनर केमिकल परफ्यूम असतं ज्याला आम्ही हवेत उडतो. पण हे शरीराला नुकसान करतं. घरात उबट वास येत असेल किंवा अशी दुर्गंध येत असेल जी आपल्याला सहन होत नसेल तर ती वस्तू तिथून हटवण्याचा प्रयत्न करा. घरात स्वच्छतेची गरज असते त्यावर फ्रेशनरने वास दाबण्याचा प्रयत्न करू नये.
टूथब्रश बदला
सकाळ- संध्याकाळ ब्रश केल्यानंतर त्याचे ब्रिसल्स पसरायला लागतात. आणि आरोग्याच्या दृष्टीनेदेखील प्रत्येक तीन महिन्यात टूथब्रश बदलायलाच हवं.
ओल्ड मेकअप कीट
कॉस्मेटिक आयटम्स जुने झाले असतील आणि तरी आपल्या वाटतं असेल की यात खराब होण्यासारखे काय? तर हा विचार चुकीचा आहे. जुने कॉस्मेटिक आयटम्स विशेषकरून लिक्विड मेकअप जसे मस्कारा, आयलाइनर यात शेकडो जर्म्स असतात. हे अप्लाय केल्यावर ते आपल्यावर ट्रांसफर होतात. म्हणून जुने कॉस्मेटिक लगेच फेका.