Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकाली पडणार्या सुरकुत्या

Webdunia
गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (09:09 IST)
अकाली पडणार्या सुरकुत्या हा महिलांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरतो. वयानुरुप त्वचेचं सौंदर्य बाधित होत असतं. वाढत्या वयाचे परिणाम दिसत असतात. हा निसर्गाचा नियम आहे. पण अकाली पडणार्या सुरकुत्या मात्र नकोशा वाटतात. त्या सौंदर्य आणि आरोग्य या दोघांवर परिणाम दाखवतात. म्हणूनच ही नकोशी बाब टाळण्यासाठी त्वचा अधिकाधिक काळ तरूण राखणं आणि त्यासाठी काही उपाय योजणं आवश्यक ठरतं. अकाली सुरकुत्या पडल्यावर उपचार करण्यापेक्षा त्या पडू नयेत याची काळजी घेणं जास्त चांगलं. का पडतात अकाली सुरकुत्या, पाहू या...
 
 * मेकअपचा अतिरेक- चेहर्यावर सतत मेकअपची पुटं असतील तर अकाली पडणार्या. सुरकुत्या त्वचेची रोमछिद्रं बंद होऊ लागतात. त्वचेतील ओलावा कमीहोऊ लागतो. त्यामुळे शुष्कता जाणवते. ही कोरडी त्वचा अकाली सुरकुत्यांना आमंत्रण देते.
* मोबाइलचा वापर- संशोधकांच्या एका गटाने केलेल्या संशोधनानुसार सुरकुत्या पडण्यामागे मोबाइलमधून निघणार्यार लहरीदेखील कारणीभूत असतात. म्हणूनच रात्री झोपताना मोबाइल दूर ठेवायला हवा. तो उशीखाली, चेहर्यालजवळ नसावा.
* औषधांचा अतिरेक - लहानसहान त्रास असला तरी बरं वाटण्याची वाट न पाहता औषधांचा आधार घेतला जातो. औषधं शरीराला वेदनामुक्त करतात हे खरं असलं तरी त्वचेवर काही दुष्परिणाम दाखवून जात असतात. म्हणजेच औषधांच्या अतिसेवनामुळे अकाली प्रौढत्व येण्याची शक्यता असते. 
* चहा - कॉफीचं मर्यादित सेवन - तुम्ही अतिरिक्त प्रमाणात चहा-कॉफीचं सेवन करत असाल तर त्वचेवर अकाली सुरकुत्या पडण्याची शक्यता अनेकपटीने वाढते असं तज्ज्ञ सांगतात. या पेयांच्या सेवनाने त्वचेतील पाणी कमी होतं आणि ओलावा नाहिशा झालेल्या रुक्ष त्वचेवर अकाली सुरकुत्यांचा धोका वाढतो. म्हणूनच चहा-कॉफीचं सेवन केल्यानंतर काही काळाने ग्लासभर पाणी प्यावं.
* व्यायामासाठी वेळ द्या - केवळ वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असं अनेकजणी समजतात. मात्र व्यायामअँटी एजिंगचं कामही करतो हे त्यांच्या गावीही नसतं. व्यायामादरम्यान मांसपेशी अधिक क्षमतेने कार्यरत होतात आणि त्वचेचं तारुण्य जपतात. म्हणूनच अकाली सुरकुत्यांचा धोका टाळण्यासाठी व्यायामाचा मंत्र जपावा.
आरती देशपांडे 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

लिपस्टिक ओठांवर टिकत नाही या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात ही 5 फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

Sweet Dish चविष्ट केळीची खीर

पुढील लेख