Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंघोळीनंतर टॉवेल गुंडाळल्याने आजार पसरतात, तुम्ही अशी चूक करत आहात का?

Wrapping towels after bathing spreads the disease
, सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (10:00 IST)
आंघोळ केल्यानंतर अंगावर टॉवेल गुंडाळणे सामान्य पद्धत आहे. मात्र ही सवय सामान्य असली तरी याचे काही तोटे देखील होऊ शकतात. आंघोळीनंतर अंगावर टॉवेल गुंडाळणे तुमच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरू शकते. कारण टॉवेलमध्ये बरेच धोकादायक बॅक्टेरिया असतात.
 
एका संशोधनात आढळले आहेत की टॉवेलमध्ये आढळणारे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात अनेक प्रकारच्या आजारांना जन्म देऊ शकतात. यामुळे तुम्हाला अन्न विषबाधा आणि अतिसाराचा धोका देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
 
खरंतर अंघोळ केल्यावर अंग पुसल्यावर टॉवेल ओला होतो आणि हा ओलावा बराच काळ टॉवेलमध्ये टिकून राहतो. ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. जर तुम्ही तो टॉवेल वापरला तर बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करु शकतात. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका कायम असतो.
 
आंघोळीनंतर टॉवेल अंगावर गुंडाळण्याऐवजी उन्हात वाळवावा. अशाने त्यात असलेले बॅक्टेरिया मरतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय दुसऱ्याचा टॉवेल वापरू नये. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जोडीदारासोबत रोमान्स वाढवण्यासाठी Valentine Dayच्या दिवशी निवडा राशीनुसार कपड्यांचा रंग