कानदुखी ही वरचेवर उद्भणारी समस्या आहे. कानदुखीची कारणंही अनेक असतात. त्यातही लहान मुलांमध्ये कानदुखीचे प्रमाण बरंच जास्त आहे. अशा वेळी परतिजैविकांऐवजी काही घरगुती उपा करणं जास्त उपयुक्त आणि संयुक्तिक ठरू शकतं अर्थात कानदुखीमागचं कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जंतूसंसर्गामुळे कानदुखी झाली असेल तर हे घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.
* लसणाच्या दोन पाकळ्या वाटून घ्या. तिळाच्या दोन टेबलस्पून तेलात हे मिश्रण घाला. लसूण काळे पडेपर्यंत हे मिश्रण गरम करा. थंड झाल्यानंतर काही थेंब कानात घाला. लसणामुळे कानदुखीची समस्या दूर होऊ शकेल.
* तुळशीच्या पानांचा रसही यावर प्रभावी ठरू शकतो. तुळशीचा रस कानात घालण्याआधी गाळून घ्या.
* तिळाच्या तेलामुळे कानातला मळ बाहेर पडतो. तिळाचं तेल एका कानात घालून थोडा वेळ झोपा. पंधरा मिनिटं याच स्थितीत राहा तेल कानाच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या. ईयर बडमुळे कानांचा मळ आत ढकलला जात असल्याने त्याचा वापर टाळावा. असा सल्ला दिला जातो.
* अँपल सिडर व्हिनेगार गरम करून कापसाच्या बोळ्याने कानांवर लावा. यामुळे जंतूसंसर्ग कमी होईल. अँपल सिडर व्हिनेगरामुळे बँक्टेरिया नष्ट होतात.
* कानदुखीवर मीठही प्रभावी आहे. थोडं मीठ गरम करून कापसाच्या बोळ्याला लावा. हा बोळा कानात ठेवा. मीठामुळे सूज कमी होण्यास मदत होते.