Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चष्म्याचे डाग नाकावरून काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

spaces
आजच्या काळात आपला बहुतेक वेळ संगणक किंवा मोबाईल फोन वापरण्यात जातो. यामुळेच आजकाल वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत चष्मा घातल्यामुळे दृष्टी कमी होत आहे. सतत चष्मा लावल्याने नाकावर काळे डाग पडतात जे खूप वाईट दिसतात. हे डाग दूर करण्यासाठी अनेकजण महागडी क्रीम आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात.पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. काही घरगुती उपायांना अवलंबवून आपण या घरगुती उपाय केल्याने डागांपासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.

टोमॅटो

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही टोमॅटो गुणकारी आहे. ते त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. टोमॅटोची पेस्ट बनवून नाकावर चिन्हांकित भागावर लावा. असं  केल्याने  काही दिवसात फरक दिसू लागेल.

कोरफड जेल -

चष्म्यामुळे नाकावर काळे डाग पडत असतील तर एलोवेरा जेलचा वापर करा. कोरफडीमध्ये अँटीएजिंग गुणधर्म असतात आणि ते त्वचेला आर्द्रता प्रदान करते. यासाठी कोरफडीचे पान मधोमध कापून त्याच्या गरची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट डागांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हवे असल्यास, तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले कोरफडीचे जेल देखील वापरू शकता. 
 

बटाटा-

नाकावरील चष्म्याचे ठसे काढण्यासाठी बटाट्याचाही वापर करू शकता. बटाट्याचा रस त्वचेवर ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो आणि डाग दूर करण्यास मदत करतो. नाकावरील चष्म्याचे डाग काढण्यासाठी बटाट्याचा रस लावा. यासाठी कच्चा बटाटा घेऊन किसून घ्या. आता ते पिळून त्याचा रस काढा. बटाट्याचा रस प्रभावित भागावर लावा आणि 10-15 मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

मध-

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी देखील मध खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत जे त्वचेवरील डाग दूर करण्यात मदत करतात. यासाठी डागांवर मध लावून हळुवार हाताने मसाज करा. त्यानंतर चेहरा कोरडा झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा. 
 

संत्र्याची साल

चष्म्यामुळे होणारे डाग दूर करण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. संत्र्याच्या सालीमध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात जे डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी संत्र्याची साल बारीक करून त्यात दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
 
अस्वीकरण: वेबदुनियावर औषध, आरोग्यविषयक टिप्स, योग, धर्म, ज्योतिष, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी विषयांवर प्रकाशित/प्रसारित केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी असून त्या विविध स्रोतांमधून घेतलेल्या आहेत. वेबदुनिया या माहितीच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. आरोग्य किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कोणताही प्रयोग करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. ही सामग्री जनहितासाठी सादर केली गेली आहे आणि तिला कोणत्याही वैज्ञानिक पुराव्याचा आधार नाही.
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

60th Birthday Wishes 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा