ऑफिसमध्ये कामाच्या दरम्यान तणाव असणे सामान्य आहे. सामान्यतः असे दिसून येते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ताण खूप वाढतो तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या ऑफिस किंवा कामावरच नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही दिसून येतो. ऑफिसचा ताण सर्वांनाच असतो.ऑफिसच्या तणावावर मात करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अवलंबवून ताण कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
1 तणावाचा मागोवा घेणे -
ऑफिसच्या ताणामुळे मानसिक पातळीवर खूप त्रास होत असेल, तर ऑफिसच्या ताणाचा मागोवा घ्या .डायरी लिहिण्याची सवय असल्यास फक्त विचार डायरीत लिहू नका, तर तणावाखाली असाल तेव्हा तणावाची परिस्थिती लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे न केवळ केवळ स्वत:ची तपासणी करण्याची संधी मिळते,तर ट्रिगर ओळखू शकता. ज्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करायला सोपे होते.
2 निरोगी पर्यायाची निवड करणे -
तणाव कमी करण्यासाठी लोक मिठाई, तळलेले पदार्थ, फास्ट फूड किंवा अल्कोहोलचे सेवन करतात असे सर्वसाधारणपणे दिसून येते. परंतु आपण निरोगी पर्याय निवडणे चांगले आहे. दररोज नियमित व्यायाम करा. हा एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे. याशिवाय, योग, संगीत ऐकणे, गेम खेळणे इत्यादी अनेक विविध क्रियाकलापांद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.
3 काम आणि वैयक्तिक जीवन संतुलित करणे-
बहुतेक लोक त्यांच्या कामात इतके व्यस्त होतात की त्यांचे वैयक्तिक जीवन विस्कळीत होऊ लागते आणि म्हणूनच ते स्वतःला खूप तणावाखाली अनुभवतात.असं होऊ नये या साठी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सीमारेषा ठरवणे कधीही चांगले. रात्रीच्या जेवणाच्या वेळी फोनला उत्तर न देण्याचा नियम बनवू शकता.
4 आरामदायी तंत्राचा वापर करणे -
अतिरिक्त ताण दूर करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे काही रिलॅक्सींग तंत्रांचा अवलंब करणे. दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम केल्याने मानसिकदृष्ट्या अधिक शांतता आणि आनंदी वाटेल. तसेच त्याचा सकारात्मक परिणाम कामावरही दिसून येईल.