बरेच लोकांचे वेळेपूर्वी केस गळू लागतात. अशात टक्कल पडू लागते. अनेक लोक टक्कल दूर करण्याचा दावा करतात, परंतु आम्ही कोणताही दावा करत नाही. मात्र जे काही उपाय सांगत आहोत ते प्राचीन काळापासून अमलात आणले जात आहे. यामुळे ज्या लोकांच्या केसांमध्ये जरा देखील मुळे असतील त्यांच्या केसांची वाढ होण्याची शक्यता असते.
आकड्यांचे दूध लावल्याने फायदा होईल | Baldness will go away by applying aakde doodh:
आकड्याचे फूल भगवान शंकराला अर्पण केले जाते. याचे दूध डोक्याच्या रिकाम्या जागेवर काही दिवस लावल्यास केस वाढू लागतात. आकड्याचे दूध गरम असतं. फक्त ताजे दूध वापरावे.
त्याचवेळी आकड्याची एक छोटी फांदी तोडून त्यातून बाहेर पडणाऱ्या दुधाचे चार ते पाच थेंब डोक्याला लावा.
जळू थेरेपी करुन बघा Remove baldness with leech therapy:
कोंडा, बुरशी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे केस गळत असल्यास जळू थेरपी करून पहा.
याला विज्ञानाच्या भाषेत लीच थेरपी म्हणतात. टक्कल पडण्यावर ही थेरपी सर्वात प्रभावी ठरली आहे.
टक्कल पडण्यावर हा उपचार 2,000 वर्षांहून अधिक काळापासून सुरु आहे.
हिंदू वेद अथर्ववेदात याचा उल्लेख आहे.
या थेरपीमध्ये तुमच्या डोक्यावर जळू टाकली जाते. डोक्यात कितीही अशुद्ध रक्त असले तरी जळू ते चोखते.
डोक्यात बुरशी उद्भवते ज्यामुळे केसांचे कूप अडकतात आणि केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळणे सुरू होते.
जळू ही बुरशी खातात आणि डोके पूर्णपणे स्वच्छ आणि बुरशीमुक्त होते.
यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण वाढते आणि केसांच्या कूपांमध्ये नवीन टोकापासून केस वाढू लागतात.
अर्धा तास डोक्याला चिकटलेली जळू पुन्हा 6 महिने वापरली जात नाही आणि ती जळू दुसऱ्याच्या डोक्यावरही वापरली जात नाही.
अर्ध्या तासाने जळूच्या तोंडावर हळद लावल्याने डोके वेगळे होते.लीच थेरपी दरम्यान आणि नंतर कोणत्याही प्रकारचे साबण वापरण्यास मनाई आहे.
याशिवाय लसूण किंवा कांद्याचा रस लावल्याने केसातील बुरशीही दूर होते.
अमरवेल ने फायदा होईल
अमरवेल वाटून तिळाच्या तेलात मिसळून डोक्यावर लावल्याने नवीन केस येतात असे म्हणतात.
अमरवेलचे तुकडे तिळाच्या तेलात मंद आचेवर किमान अर्धा तास गरम करावे. नंतर गाळून एका बाटलीत भरुन घ्यावे नंतर डोक्यावर लावावे.
5 ग्रॅम अमरवेल वाटून अर्धा लिटर पाण्यात 20-25 मिनिटे उकळा. नंतर गार झाल्यावर या पाण्याने केस धुवावे. असे केल्याने फंगस दूर होऊन केस गळती थांबते आणि नवीन केस येतात.
अमरवेलच्या काढा तयार करुन केसांमध्ये लावल्याने कोंडा, केस गळणे आणि अवेळी केस पांढरे होणे या सारख्या समस्या नाहीशा होतात.
डिस्क्लेमर : आरोग्याससंबंधी घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.