Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नस दाबली गेली असल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा

नस दाबली गेली असल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा
, गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (09:10 IST)
नसां मध्ये वेदना होणे ही गंभीर समस्या नाही, परंतु कधीकधी शरीराच्या कोणत्याही भागाच्या मज्जा तंतूवर दाब असह्य वेदना देते. नसांच्या वेदने ला दुलर्क्षित केल्याने हे धोकादायक असू शकते. या साठी काही उपचार आहे चला जाणून घेऊ या 
 
सर्वप्रथम दबलेल्या नसांची लक्षणे जाणून घेऊ या. 
 
* मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना होणे.
* शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे.
* स्नायूंचा कमकुवतपणा.
* शरीराच्या भागात मुंग्या येण्याची भावना होणे.
* अनावश्यक सर्दी.
 
या वरील उपचार -
 
मॉलिश करू शकता- 
जी नस दाबली गेली आहे अशा भागावर सौम्य कोमट नारळ,मोहरी,ऑलिव्ह तेल किंवा एरंडेल तेलाची मसाज करा. या मुळे वेदने पासून  आराम मिळेल आणि नस बरी होईल.
 
* शेकावे- 
दबलेल्या नसाची सूज कमी करण्यासाठी बर्फ किंवा गरम पाण्याने शेकावे. वेदनेच्या क्षेत्राला किमान 15 मिनिटे दिवसातून 3 वेळा शेकावे. या मुळे सूज कमी होईल आणि वेदनेपासून मुक्ती मिळेल.
 
* सेंधव मीठ- 
सूती कपड्यात सेंधव मीठ घाला. एक बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये सेंधव मिठाची कापड घाला आणि या पाण्याने अंघोळ करा किंवा 30 मिनिटे त्यामध्ये बसावे. या मुळे नसांचे दुखणे कमी होईल. 
 
* मेथी दाणे- 
मेथी दाणे देखील या साठी प्रभावी आहे.  हे सायटिका आणि नसांच्या दुखण्याला दूर करण्यात प्रभावी आहे. या साठी मेथीदाणे पाण्यात भिजवा आणि वाटून पेस्ट बनवा दुखणाऱ्या क्षेत्रावर लावा. 
 
* पुरेशी झोप घ्या- 
झोपताना शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतो, या मुळे दबलेल्या नसाच्या  
भागाला आराम मिळतो म्हणून जास्त विश्रांती घ्या दुखणाऱ्या भागावर कमी दाब टाका.
 
* पोईश्चर बदला
चलण्याची, बसण्याची, झोपण्याच्या चुकीच्या स्थिती मुळे त्रास वाढू शकतो म्हणून लक्षात ठेवा की नसांवर दाब पडू नये.उशी किंवा  एडजस्टेबल चेयर वापरा जेणे करून आपल्याला आराम मिळेल. 
 
* स्ट्रेचिंग आणि योग फायदेशीर आहे- 
हे  देखील या साठी प्रभावी  आहे परंतु स्ट्रेचिंग करताना जास्त ताण देऊ नका. तसेच  तज्ज्ञाचा सल्ला घेऊन वॉकिंग,रनिंग सायकलिंग आणि योगासन करावे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

-उगवताना आणि मावळताना सूर्य मोठा का दिसतो असं का?