Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पोटदुखीच्या समस्येने त्रस्त आहात, हे घरगुती उपाय अवलंबवा

पोटदुखीच्या समस्येने त्रस्त आहात, हे घरगुती उपाय अवलंबवा
, बुधवार, 4 मे 2022 (18:33 IST)
ओटीपोटात दुखणे किंवा ओटीपोटात पेटके येणे ही एक सामान्य समस्या आहे. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की अपचन, गॅस, छातीत जळजळ होणे , बद्धकोष्ठता इ. तथापि, पोटदुखी काही गंभीर समस्यांमुळे देखील असू शकते, जसे की अल्सर, हर्निया, अपेंडिसाइटिस इ. पोटात दुखल्यावर कोणत्याही कामावर लक्ष लागत नाही. त्या पासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक औषध घेतात. पण नेहमी औषध घेतल्याने काही त्रास देखील होऊ शकतो. पोट दुखीवर काही घरगुती उपाय सांगत आहोत.ज्यामुळे अपचन, गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 आलं -
आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे पचन प्रक्रियेला नियंत्रणात करण्याचे काम करतात तसेच पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी ठेवतात. यासाठी सर्वप्रथम आलं  बारीक चिरून नंतर पाण्यात टाकून 3-4 मिनिटे उकळून गाळून घ्या. नंतर त्यात थोडे मध घालून दिवसातून किमान 2-3 वेळा थोडे थोडे प्या. यामुळे पोटदुखीमध्ये आराम मिळतो तसेच पचनक्रिया सुधारते. 
 
2 बडीशेप-
बडीशेपमध्ये पौष्टिक आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. बडीशेप अपचनामुळे होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. याशिवाय गॅस आणि पेटके सारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो. यासाठी एका कप पाण्यात एक चमचा एका बडीशेप टाका आणि 10 मिनिटे उकळा. नंतर थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर गाळून त्यात मध मिसळून प्या. हे मिश्रण दिवसातून किमान 2-3 वेळा प्यावे जेणेकरून पोटदुखी कमी होईल. 
 
3 हिंग -
हिंगाच्या सेवनाने पोटदुखी, अपचन किंवा गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमूटभर हिंग टाकून  चांगले मिसळा. नंतर ते मिश्रण दिवसातून 2-3 वेळा प्या. इच्छा असल्यास तुम्ही या मिश्रणात चवीनुसार सेंधव मीठही घालू शकता. पोटदुखी आणि गॅसच्या समस्येवर हा उपाय खूप फायदेशीर आहे. 
 
4 पुदिना -
पुदिना पोटदुखी आणि गॅस कमी करण्याचे काम करते. याशिवाय पचनक्रिया सुधारते. यासाठी एक कप पाण्यात सुका पुदिना टाकून 10 मिनिटे उकळवा आणि नंतर ते मिश्रण गाळून त्यात थोडे मध टाका. आता हे मिश्रण दिवसातून 2-3 वेळा चहासारखे प्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पोस्टात 38 हजारहून अधिक जागांसाठी बंपर भरती