सर्दी पडसं हे बदलत्या हंगामांत होणं साहजिक आहे. सर्दीची लक्षणे होणे म्हणजे काही लोकांच्या नाकातून पाणी गळते तर काहींची नाक अवरुद्ध होते. तर काहींना सर्दी जास्त असल्यावर ताप देखील येतो.सर्दी पडस ची लक्षणे दिसत असल्यास त्यावर त्वरितच काही घरगुती उपचार केल्याने इतर रोगांचा सामना करावा लागत नाहीचला तर मग हे उपचार काय आहे जाणून घेऊ या.
* थोडंसं आलं,ओवा(1चमचा),लवंग(5),काळी मिरी(3),मेथीदाणे (1चमचा),तुळस आणि पुदिना पाने(प्रत्येकी 10),या सर्वांचा काढा बनवून त्यात कच्ची साखर(खांडसारी) मिसळून दिवसातून दोन वेळा घेतल्याने आराम होतो.
* 100 ग्रॅम लसूण 1 कप दुधात 1/2 कप होई पर्यंत उकळवून घ्या. हे झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी न्याहारीच्या पूर्वी घ्या.
* सम प्रमाणात 1 चमचा कांद्याचा रस मधात मिसळून दिवसातून तीन वेळा घ्या.
* हळद आणि सुंठपूड लेप बनवून कपाळी लावा.
* काळीमिरपूड जाळून त्याचे धूर घेतल्याने बंद नाक उघडेल.
* आल्याच्या तुकड्याचा काढा 20 मिली ते 30 मिली दिवसातून तीन वेळा घेतल्याने सर्दी पासून आराम मिळतो.
* भेंडीचा 50 मिली.काढा दिवसातून 3 वेळा घेतल्याने घशाची खवखव आणि कोरडा खोकला कमी होतो.
* एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा मिसळून दिवसातून दोन वेळा आणि झोपताना गुळणे केल्याने घशाची खवखव पासून आराम मिळतो.