Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जायफळचे गुणधर्म जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (23:19 IST)
जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो. जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हाल लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि आजूबाबूला लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहर्याावरील डाग नाहीसे होतात.
 
संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे, चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो.
 
पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे 2-3 थेंब साखरेत मिसळून खावेत.
 
दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही जायफळाचा उपयोग होतो.
 
सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळविण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते.
 
बाळाला कफ झाला असताना किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो.
 
बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे हे प्रत्येक आईसाठी कठिण काम असते. वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळावे. दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments