Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Potato Juice : केसांच्या प्रत्येक समस्यांचे समाधान!

Webdunia
बर्‍याच वेळा अस होत की जास्त केमिकल आणि शॅम्पूचा वापर केल्याने केसांचे बरेच आजार होण्याची शक्यता असते. जास्तकरून महिलांचे कोरडे केस, कोंडा आणि  केसांची ग्रोथ थांबल्या सारखे वाटते. महागडे केमिकल युक्‍त हेयर प्रॉडक्ट सोडून तुम्ही नॅचरल उपायांच्या मदतीने केसांच्या सर्व समस्येला दूर करू शकता. बटाटा एक अशी वस्तू आहे ज्याचे सेवन केल्याने तुम्ही केसांच्या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.  
 
तुम्ही बटाट्यात मध, दही आणि लिंबाचा रस मिसळून तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.  
 
1. दाट आणि सॉफ्ट केसांसाठी 
दोन ते तीन बटाटे घ्या, याला सोलून याचे पेस्ट तयार करा. यानंतर या पेस्टमध्ये अंड्याचा पिवळा भाग आणि मध मिसळा. त्यानंतर या पेस्टला केसांवर लावा. याला काही वेळ वाळू द्या. जेव्हा हा पॅक वाळून जाईल तेव्हा चांगल्या माइल्ड शँपूने केस धुऊन घ्या. दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने तुम्हाला केसांमध्ये फरक दिसू लागेल.   
 
2. लांब केसांसाठी 
दोन बटाटे घ्या आणि याचा रस काढा. यात दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा. या मिश्रणाला केसांच्या मुळांना लावा. याला 30 ते 40 मिनिटापर्यंत केसांमध्ये राहू द्या. यानंतर पाण्याने केस धुऊन घ्या. लगेचच शँपू लावायची गरज नसते.  
 
3. कोंडा असलेल्या केसांसाठी
एक किंवा दोन बटाटे घेऊन त्यांचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि दही मिसळून त्या पेस्टला केसांना लावून थोड्यावेळेसाठी राहू द्या. नंतर एखाद्या चांगल्या शँपूने केस धुऊन घ्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

उरलेली टूथपेस्ट किचन मध्ये अशा प्रकारे वापरा, सर्व भांडी चमकतील

लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये डिप्लोमा करून करिअर करा

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

कफ आणि खोकल्यावर घरगुती उपाय

फिटनेसः ग्रीन पावडर, ग्रीन सप्लिमेंट्समुळे आरोग्य सुधारतं का? वाचा

पुढील लेख
Show comments