Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शांत झोपेसाठी हे करून बघा...

शांत झोपेसाठी हे करून बघा...
- जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते.
 
- पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते.
 
- ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते.
 
- रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते.
 
- नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी साहायक असतात.
 
- शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्‍स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार करून घेतल्यासही फायदा होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यामुळे नक्कीच खळखळून ‘हसाल’