Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक्जिमाचे घरगुती उपाय

treatment of eczema
1. एलोवेरा -
एलोवेरा त्वचेसाठी फारच चांगले आहे आणि एक्जिमामुळे येणार्‍या कोरडेपणाला नियंत्रित करण्याचे काम करतो. विटामिन ई च्या तेलासोबत एलोवेरा लावल्याने खाज कमी होण्यास मदत मिळते. हे त्वचेला पोषण आणि एकाच वेळेस सूज कमी करण्यास मदत करतो. यासाठी तुम्ही एलोवेराच्या पानांपासून जेल काढून घ्या आणि विटामिन ईच्या कॅप्सूलमधील तेल काढून योग्य प्रकारे मिसळून घ्या. आणि प्रभावित जागेवर त्याला लावा.  
 
2. कडुलिंबाचे तेल  -
कडुलिंबाच्या तेलात दोन मुख्य एंटी इंफ्लेमेटरी कंपाउंड असतात. हे तेल त्वचेला मॉइश्चराइज करत, कुठल्याही दुखण्याला दूर करतो आणि   संक्रमणाच्या विरुद्ध सुरक्षा प्रदान करतो. यासाठी तुम्हाला 10 ते 12 थेंब कडुलिंबाच्या तेलात 4 थेंब जैतूनचे तेल घेऊन प्रभावीत जागेवर लावायला पाहिजे.  
treatment of eczema
3. मध आणि कलमी (दालचिनी) -
यासाठी तुम्हाला 2 चमचे मध आणि 2 चमचे कलमीचे पावडर घेऊन योग्य प्रकारे याची पेस्ट तयार करावे आणि प्रभावित जागेवर ही पेस्ट लावावी. वाळल्यानंतर याला पाण्याने धुऊन घ्यावे. मध एक व्यापक स्पेक्ट्रम एंटीमायक्रोबायल एजेंट आहे. हे त्वचेला शांत करतो, सूज कमी करतो. कलमी (दालचिनी) देखील एक एंटीमायक्रोबायल एजेंट आहे. हे एंटीऑक्सीडेंटमध्ये समृद्ध आहे आणि यात एंटी इंफ्लेमेटरी गुण देखील आहे. प्रभावित जागेला स्वच्छ धुऊन घ्यावे आणि त्या जागेवर ही पेस्ट लावावी. वाळल्यानंतर पाण्याने धुऊन घ्यावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्लॅट टमीसाठी रोज फक्त 15 मिनिट