Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपू दे अंधार सारा

Diwali Marathi
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे....
 
जाग यावी सृष्टीला की
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
घट्ट व्हावा प्रेम धागा...
 
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी...
 
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणसाचा देव व्हावा.........
 
आजपासून दिवाळी सुरू होतेय...
सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शुभांगी लाटकर जंक्शन वाराणसी सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त