Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आहारबोली

food
, गुरूवार, 20 जून 2024 (16:26 IST)
माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे: हस्ताक्षर, सही, दिसणे, काही लकबी, वगैरे वगैरे.
पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट जेवताना, जेवण्याच्या आधी वा नंतर जेवणाराची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.
 
म्हणजे बघा ..... 
समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून तो उचलतो.
 
जसे की,
ताटातील गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.
 
तळण, पापड उचलणाऱ्या आणि पापड लवकर मोडतो अश्या माणसांत, संयम कमी असतो.
 
वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे साधी सरळ असतात, ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.
 
भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात, यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.
 
जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात. 
 
लोणचे कुठले आहे? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात. 
 
काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.
     
यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.
पहिला जेवणाच्या आधी काही प्रतिक्रिया असणारे आणि दुसरा जेवणा नंतरची प्रतिक्रिया असणारे.
   
जेवणाच्या आधी ताट, भांडी वाढायला सुरुवात झाली की भांडी स्वच्छ आहेत का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणारे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात . अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात, अशांना मित्रमंडळी कमी किंवा असतीलच तर ते पण याच Category तील असतात.
 
पंगतीत वाढणे सुरु आहे, अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे.. माझ्या पानात नाही.. आत्ताच हवे म्हणून वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात, भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो वा नसो. 
हे लोक मत्सरी असतात. सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
    
गोड पदार्थ वाढला जात असताना 
"मी काय म्हणतो फक्त बासुंदीच आहे, म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले" 
असा डायलॉग मारणारे, मुलाकडचे असतात वा अत्यंत व्यवहारी कंजूष मनोवृत्तीचे असतात.
 
जेवणाच्या आधी वा जेवताना जे लोक "बाकी सगळे ठीक होते, पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते" म्हणणारी अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात. समोर चांगले ताट वाढले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.
 
ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी !
  
या सर्वांपलिकडे एक विशेष Category आहे.
जेवण झाल्यावर "ताक आहे का?" म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर "अरेरे ताक असते ना तर मजा आली असती" असा शेरा मारणारे कुजकटच.
 
वाचा आणि ठरवा तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

180 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये खलनायक दाखवलेला हा अभिनेता, शूटिंग करतांना खरच पाण्यात बुडाला होता