मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्ततेनुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते
पाण्याचा - माठ
अंत्यसंस्काराला - मडकं
नवरात्रात - घट
वाजविण्यासाठी - घटम्
संक्रांतीला - .सुगडं
दहिहंडीला - हंडी
दही लावायला - गाडगं
लक्ष्मीपूजनाचे - बोळकं
लग्न विधीत - अविघ्न कलश
अक्षय्य तृतीयेला - केळी व करा (स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा)