आत्ता नेहमीच्या फळवाल्याकडे गेलो होतो. बाकी फळं घेतल्यावर तो म्हणाला, "काय साहेब, हापूस नाही घेतला अजून? अस्सल देवगड आहे बघा!
"मी आंबा हातात घेऊन वास घेतला आणि म्हणालो, "नेहमीच्या गिऱ्हाईकाला गंडवतोस होय? नाकाच्या इतक्या जवळ घेतला तरी वास नाही आला ... हापूस म्हणजे कसा घमघमाट हवा ...!"
शांतपणे माझ्या हातातला आंबा घेत तो म्हणाला, "तुम्ही टेस्ट करून बघा"
मग मी तो आंबा कापून फोड टेस्ट करायला देईल म्हणून वाट बघत थांबलो ... फोड द्यायची त्याची काही हालचाल दिसेना म्हणून दोन मिनिटांनी त्याला विचारलं, "अरे देतोस ना टेस्ट करायला?"
तर तो म्हणाला, "आंब्याची टेस्ट नाय हो, कोरोना पुन्हा येतोय, तिकडं सरकारी दवाखान्यात जाऊन टेस्ट करून बघा असं सांगायलोय, आंब्याचा वास येईना झालाय तुम्हाला!"