Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
आयुष्य झालंय Busy तरी,
नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे....
कोणी दाखवत उघड उघड,काहींचा Silent mode आहे....
बरीच एकटी मनं आज Mobile मुळे रमतात....
न भेटताही गप्पांचे अड्डे, Whatsapp कट्ट्यावर जमतात...
दूरदेशी गेलेल्या मुलाशी 'Skype' मुळे chat होतो...
विरहाच्या दुःखाचा एक क्षणात Format होतो....
हजारो मैलांची अंतरे, एका बटनाने मिटतात,
गणपती,दिवाळीला भेटणारे भाऊ -बहीण, रोज 'Group' वर भेटतात....
शाळा संपते,अन मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना पूर येतो....
Facebook वर एक 'Search'ने हाही Problem दूर होतो...
काही समस्या Upload करताच, Solution सहज Download होतं...
कठीण वाटणारं आयुष्याचं कोडं सहजपणे 'Decode' होतं....
Intenet च्या जाळ्यामुळेच, आपण दूर असूनही 'Close' आहोत...
भेटू वर्षातून एकदा कदाचित पण सोबत 'Online' रोज आहोत....