शहरात एक असं दुकान उघडलंय जिथं वेळ विकत मिळतो.
ही माहिती मला एका मित्राने दिली.
मी त्या दुकानाचा पत्ता मिळवला आणि तिथे पोचलो.
"माझ्याकडे खूप पुस्तकं जमा झाली आहेत, पण मला ती वाचायला वेळ मिळत नाही.
मला आठवड्यातून चार दिवस १ तास वाढवून हवा आहे. "
मी विक्रेत्याला म्हणालो.
तो जरासा हसला, मग देतो म्हणाला.
मी खिशातलं पॉकेट काढत त्याला विचारलं, "एका तासाचे किती रूपये?"
विक्रेता म्हणाला, "पैशाने वेळ वाढवून मिळत नाही. त्याची किंमत तुम्हांला झोपेने चुकवावी लागेल."