Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबा नेहमीच मागे का असतात ??? हे माहित नाही

Webdunia
बुधवार, 24 जून 2020 (20:23 IST)
बाबा नेहमीच मागे का असतात ??? हे माहित नाही
आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... बाबा मागे का आहेत ???  हे माहित नाही. 

आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... बाबा मागे का पडतात ??? हे माहित नाही.
 
आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. बाबा मागे का पडतात ??? हे माहित नाही.
 
जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवताना आपण पाहतो, की बाबा नेहमीच मागे पडतात का...??? हे माहित नाही.
 
कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... बाबा अजूनही मागे का आहेत ??? हे माहित नाही.
 
आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही बाबा मागे का आहेत ??? हे माहित नाही.
 
आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा बाबा नेहमीच का मागे पडतात??? हे माहित नाही. 
 
आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही... बाबा का मागे पडतात ??? हे माहित नाही.
 
आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. बाबा मागे का पडतात..??? हे माहित नाही.
 
वडील मागे, ‘मागच्या बाजूला’ आहेत. कारण ते कुटुंबाचा कणा आहेत. त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.
 म्हणून तर ते... मागे आहेत.

आई श्रेष्ठ आहे पण, म्हणून... बाबा कनिष्ठ नाहीत, एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली

या घटनेमुळे संपूर्ण देश एक झाला आहे', पहलगाम हल्ल्यावर नवाजुद्दीनने व्यक्त केले दुःख

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

सर्व पहा

नवीन

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

गायक सोनू निगम विरोधात एफआयआर दाखल

अभिनेता अनिल कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन

Safe honeymoon destinations हे हनिमून डेस्टिनेशन्स जोडप्यांसाठी सुरक्षित आहे

पुढील लेख
Show comments