Marathi Biodata Maker

पण सासू तेवढी बदलून दे....

Webdunia
बुधवार, 11 जून 2025 (17:03 IST)
"कशी आहेस?"
 
"मी छान. तू कशी आहेस?"
 
"मी पण छानचय."
 
"काय खास?"
 
"कांSSSही खास नै
अन् विशेष पण नै बै"
 
"काय केलंस वटसावित्री दिवशी?"
 
"काय करणार गं वेगळं? हेच की..
 न्हाणी धुणी,
अन्
स्वयंपाक पाणी..
तूझं?"
 
"आमच्याकडं वडाची पूजा झाल्याशिवाय सासूबाई पाणी पण प्यायला देत नाहीत."
 
"असं...?"
 
"शिवाय सोवळ्यानं स्वयंपाक."
 
"अवघडंचै बै"
 
"पण ऐक ना. मला सासऱ्यांनी तोळाभर सोनं दिलंय. अन् तूला हवा तो दागिना घे म्हणालेत करून....!"
 
"अग्गोबाईSSS.... 
काय सांगतेस काSSSSSय
पण का म्हणे?"
 
"असंच"
 
"असंच म्हणजे?"
 
"अगं मी वडाला प्रार्थना केली ना... 
ती त्यांनी ऐकली आणि 
ती त्यांना खूप आवडली."
 
"काय प्रार्थना केली होतीस तू अशी?"
 
"हेच, की सात जन्म हाच नवरा मिळू दे... पण"
 
"पण काय?"
 
"पण सासू तेवढी बदलून दे....!!!"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी पल्लवी जोशी एक अष्टपैलू कलाकार

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

Holy lakes in India भारतातील पंच सरोवर, जिथे स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो

कॉकटेल मध्ये जिवंत मासा

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

पुढील लेख
Show comments