एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती.
घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती.
परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती.
जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली
बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची
उडाली धूळधाण.
तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट
आणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट
काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल.
चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.
ती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.
तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत !
उतणार नाही, मातणार नाही
घेतला वसा सोडणार नाही.
स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.
यथासमय देवाच्या देव्हार्यात डोकवावे, मन मोकळे करावे.