Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कावळा - चिमणीचा पूर्वापार शेजारी.

Webdunia
गोष्ट तशी जुनीच
कावळा चिमणीची
पण
नव्या जमान्यातली
....
कावळा - चिमणीचा पूर्वापार शेजारी.
 
कावळ्याचं घर आजही शेणाचं,
आणि चिमणीचं मेणाचं.
जोरदार पाऊस झाला.
कावळ्याचं घर गेलं वाहून,
तो गेला चिमणीकडे धावून.
चिमणी आपली पिलातच होती व्यस्त,
कावळा आपला भिजून भिजून त्रस्त.
 
असेच मग दिवस गेले.. वर्ष सरली.
 
चिमणीचं पिलू भरारी घेत गेलं परदेशी,
 
आठवणीनं चिमणी रडे फोटो घेऊन उशाशी.
 
पिल्लू परदेशातून काळजी घेई, भरपूर पैसे पाठवी..
 
पैसे नको पिल्लूचं हवं, चिमणी पैसे साठवी.
 
एके दिवशी आजारी पडली तर कुणीच आलं नाही चिमणीसाठी धावून,
 
कळल्याबरोबर कावळाच मदतीला आला चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी  वाहून.
 
 
कावळा म्हणाला चिमणीला, विचार फार नको करूस लक्षात ठेव मात्र,
 
 
घरच्यांसोबत जोडून ठेवावेत आपुलकीचे चार मित्र.
 
वेळप्रसंगी आधार होतात
जीवाभावाचे मित्र पक्के,
त्यांच्यासोबत जगता येते 
आनंदाने जीवन अख्खे.
सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

रॅपर बादशाहचे नवीन गाणे मोरनी रिलीज

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

'द ग्रेट इंडियन कपिल शो' वादात अडकला,कायदेशीर नोटीस मिळाली

अद्भुत असा चंदेरी किल्ला

बिग बॉस 18 च्या घरात हिंसाचार,दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी

पुढील लेख
Show comments