Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी विनोद : लग्न गुलाबजाम आणि जिलेबीचे

Webdunia
गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम...दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले...
 
आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस...रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी...त्यांचा फारसा विरोध झाला नाही..
 
जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती यांचा तसा प्रेम विवाह तरीही इमरतीचा याला नकार ...इमरती जाम हट्टी..कट्टर...धष्टपुष्ट पंजाबी..तिचा मात्र विरोध होता....त्याचे कारणही असे की तिची मुलगी जिलेबी एवढी नाजुक-साजुक,कवळी काकड़ी सारखी, गोरीपान आणि त्याउलट गुलाबजाम गलेलठ्ठ, काळा सावळा आणि 
 
त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ कालाजाम एक नंबरचा गुंड दिसायचा...
 
खुप समजून सांगितले पण इमरती काही ऐकेना... मग बूंदीच्या लाड़वाने आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थ घातले आणि कसेबसे इमरतीचा होकार मिळवला...
 
लग्नाची बोलणी सुरु झाली...बैठका झाल्या...याद्या झाल्या...देवाण घेवाणीचा प्रश्नच नव्हता...फक्त चार वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वर्हाड़ी मंडळींना पंचतिखटीय, चटपटित, चमचमित, जेवण द्यायचे हे तय झाले...
 
आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निच्छित झाली..
 
सगळे कामाला लागले...निमंत्रणे धाडली जावु लागली...
 
बूंदीच्या लाडुचा गोतावळा मोठा, अगदी रव्यापासून, मग बेसन,शेंगदाना ते मोतीचूर पर्यन्त सगळ्यांना निमंत्रणे गेली...
 
इमरतीने आपल्या बहिणीला रबड़ीला मदतीला बोलावून घेतले,तिच्या बरोबर लस्सीही आली...
 
इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले..बासुंदीची बहिण खीर आणि त्यांची सगळी मूल, रवा, गवले, तांदूळ इत्यादि यांना बोलावले गेले...
 
बोलता बोलता...लग्नाची तारीख येवून ठेपली..
 
मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला...
 
मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले..त्यावर छान सूंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले...
 
स्टेजच्या मागे...वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले  आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळयांच्या माळांनी आरास करण्यात आली..
 
पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली...
 
स्टेजवर चढण्यासाठी काजुकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या...
 
हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला...विविध प्रकारच्या बिस्किटाच्या, नानकटाइच्या खुर्च्या मांडण्यात आल्या..
 
एक एक पाहुणे येवू लागले.... बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली.... ...वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरु झाली... 
 
कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळ पापड़ी इत्यादि मंडळी येवून विराजमान झाली...
 
बूंदी, शंकरपाळी, चिक्की ई. लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करत होती....नुक्ती आपला जूना रुबाब कायम ठेवत दुरून सर्व बघत होती....
 
दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोडीशेव आणि रेवड़ी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघुन उगाच बिचकुन बसले होते..
 
सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा, रसभरीत कुल्फिवर लाइन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता...
 
म्हैसूरपाक,गाजर हलवा आणि मुगडाल हलवा आल्या गेल्याचे स्वागत करत होते..
 
आमरस बाहेर गावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
 
तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली...शेवटी म्हाळसा सारखीच ती, तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या...
 
मग याद्यात् ठरल्याप्रमाणे थोऱ्या मोठयांचा म्हणजे करंजी, साठोरी, अनारसे,नारळीभात, इत्यादि यांचा मानपान करण्यात आला.
 
शिरा आणि त्याची बायको लापशी यांना 'मेहुन' म्हणून बोलावण्यात आले..
 
तेवढ्यात गुरूजी म्हणजे 'उकडीचे मोदक' यांनी विवाह समय जवळ आल्याची व वराला वधुला मंडपात आणण्याची आज्ञा दिली...
 
गुलाबजामचे मामा पेढ़े आणि जिलेबीचे मामा पेठा  वधुवरांना घेवून मंडपात आले.
 
साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या...
 
ग़ुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्य पूजन करण्यात आला...जिलेबी वधु आपल्या नारंगी शालुत खुपच खुलुन दिसत होती...तिला केशराचा टिळा लावण्यात आला...
 
माहिम हलव्याचा अंतरपाठ धरण्यात आला..मंगलाष्टके झाली....
 
छोट्या छोट्या गोळ्याच्या माळांचा हार वधु वरांनी एकमेकांना घातला...
 
लग्न लागताच पंच तिखट आणि चमचमित जेवणाच्या पंक्ती उठु लागल्या..
 
जेवणात...समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, SPDP ढोकळा, ठेपले, बटाटेवडा, मिरची वडा अश्या आणि अनेक पक्वान्नाचा फडशा पडत होता..
 
जेवणावळी नंतर, जिलेबीची पाठवणीची वेळ आली.
 
चॉकलेटची गाडी सजवली गेली...जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रड़ू लागली...ते पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बूंदीच्या लाडुच्या डोळ्यात सुधारस दाटुन आला तो अलगद पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला...
 
चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेवून रवाना झाली.
 
 " स्वप्नरंजीत गोडघाश्या"⁠⁠⁠⁠
सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख
Show comments