मनाच्या गाभाऱ्यात अगदी खोल खोल जायचं..... बघायचं.....
काय आहे तिथे ज्याचा त्रास कळत-नकळत होत असतो.....
मनाची तयारी करून गेलो मग मनात..... प्रवेश दाराजवळ बघितलं तर लख्ख उजेड होता.....
क्षणभर वाटलं असच असेल आत.....
जस जसा आत गेलो तस तसा अंधार वाढत गेला....
अंधार इतका वाढला की मलाच कळेना मी कुठे आहे...?
तितक्यात कशात तरी पाय अडकला.....
अरेच्चा इथे काय बरं .....?
थोडं चाचपडून पाहिलं.... तर नात्यांचा गुंता सापडला...
बऱ्याच गाठी होत्या..... प्रत्येक नात्यात.... कळत-नकळतपणे किंवा गैरसमजुतीने झालेल्या.....
प्रयत्न केला थोडासा..... सोडवायचा.....
पण छे इतका सारा गुंता लगेच कसा सूटेल.....
एक गाठ सोडावी तर...
दूसरी घट्ट होत होती.... सोडवावी कशी.....?
वरवर स्वच्छ वाटणारं मन... आत काय काय कवटाळून बसतं......?
जुन्या आठवणी..... बरे वाईट अनुभव..... बालपण....... अगदी छोट्या छोट्या गोष्टी पासून ते मोठ्या गोष्टी पर्यंत....
आपणच कारणीभूत असतो....
कळत-नकळत अनेक गोष्टी गुपचूप जाऊन बसतात मनात....
नकळत संबंध तोडत रहातो आपण....
विसरून चुका स्वतःच्या... दोष दुसऱ्यांचे शोधत राहतो आपण...
खरंच इतके वाईट असतो का आपण.....??
बसले मग तिथेच विचार करत....
आणि मग अगदी स्थिर ठेऊन हळुवारपणे एक एक गाठ सोडवायला घेतली.....
हळू हळू जमायला लागलं.... गुंता पण कमी होऊ लागला....
हळू हळू उजेड वाढू लागला....
गुंता थोड़ा कमी झाल्यावर
अहंम नावाचा एक काळाकुट्ट प्राणी दिसला....
त्यानेच सगळा अंधार केला होता.....
हा पुन्हा पुन्हा मनात घर करणारा....
आणि मनाला घरघर लावणारा प्राणी मला मारून टाकायचा होता.....
पण तो काही केल्या बाहेर पडत नव्हता...
मनात खोलवर रुतुन ठाण मांडून बसला होता.....
मग त्यावर एक उपाय केला.....
ठरवून टाकले.... दिवसातून एकदा तरी मनात फिरून यायचं... रोज त्याला हकलायचं... रोजचा गुंता रोज साफ करायचा....
बसल्याच चुकुन गाठी तरी हळुवारपणे सोडवायच्या.....
आणि जितकं जमेल तितकं मन स्वच्छ ठेवायचं......
मन साफ
तर....
सार काही माफ.....