Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुझ्यासाठी आज फक्त!!!!

whats app message
पावसाचा शृंगार केलाय.......
इवल्याशा थेंबांचा 
कंबरपट्टा विणलाय ...
टपोऱ्या थेंबांचे 
डूल घातलेत कानात....
मोठ्ठ्या सरीची 
मोहनमाळ घातलीये गळ्यात ....
लवलवणाऱ्या हिरवाईची 
काकणं भरलीत हातात ...
टपटपणारया पागोळ्यांचा 
नाद गुंफलाय घुंगरात....
चमचमणाऱ्या बिजलीची 
चंद्रकोर रेखलीय कपाळावर .....
आणि सावळया मेघांची 
काजळरेषा पापणीवर .....
सप्तरंगी इंद्रधनू 
ल्यायलेय अंगभर ,
वाऱ्याचा सळसळाट 
घुमतोय पदरावर ......
तुला आवडतं ना म्हणून
मातीच्या सुगंधाचं 
अत्तरही माखलंय ...
अन गोजिरवाणं श्रावणफूल 
केसात माळलंय ...............
बघ तरी सख्या ,
तुझ्यासाठी 
आज 
नखशिखांत 
पाऊस 
बनून 
आलेय............. 
काय सुंदर अविष्कार आहे, मराठी भाषेचा!!  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी विनोद : पुणेकर V/S पुणेकर