आयुष्य झालंय Busy तरी ,नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे....
कोणी दाखवत उघड उघड ,काहींचा Silent mode आहे....
बरीच एकटी मनं आज Mobile मुळे रमतात....
न भेटताही गप्पांचे अड्डे , Whatsapp कट्ट्यावर जमतात...
दूरदेशी गेलेल्या मुलाशी 'Skype' मुळे chat होतो...
विरहाच्या दुःखाचा एक क्षणात Format होतो....
हजारो मैलांची अंतरे, एका बटनाने मिटतात,
गणपती,दिवाळीला भेटणारे भाऊ -बहीण, रोज 'Group' वर भेटतात....
शाळा संपते,अन मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना पूर येतो....
Facebook वर एक 'Search'ने हाही Problem दूर होतो...
काही समस्या Upload करताच, Solution सहज Download होतं...
कठीण वाटणारं आयुष्याचं कोडं सहजपणे 'Decode' होतं....
Internet च्या जाळ्यामुळेच , आपण दूर असूनही 'Close' आहोत...
भेटू वर्षातून एकदा कदाचित पण सोबत 'Online' रोज आहोत....