Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Whats App Message : आनंद

whats app message
अगं  माझा  चश्मा  कुठे  आहे..?
अहो  तुमच्या  डोळ्यावरच  आहे  की....
अशी  गंमत  झाल्यावर  मिळणारा  
आनंद!
 
बाप  होण्यापेक्षाही... 
आजोबा/आजी  होण्याचा 
 आनंद!
 
चहात  साखर  किंवा  भाजीत  मीठ विसरलेले  असतानाही,  
न  बोलता...
मिश्किलपणे  संपवून  टाकण्याचा  एक  
वेगळाच  आनंद!
 
नातवंडाच्या  कृपेने  अंगावरील  कपडे 
ओले  झाल्याचा 
वत्सल  आनंद !
आणि
त्यांनी  केलेले  हट्ट  पुरविण्याचा  
गोड  आनंद!
 
सूनेने  न  मागता  आणून  दिलेल्या  चहाचा 
व  औषध  घेतले  का..? 
या  प्रेमळ  चौकशीचा  
मोठा  आनंद!
 
वाढदिवसाला  मुलाने  दिलेल्या  शालीचा....
ऊबदार  आनंद!
 
आपण  कुटुंबाला  हवे  आहोत......
या  भावनेचा  
सुप्त  आनंद!
 
दातात  अडकलेल्या  मक्याच्या  कणसाचा  कण 
निघाल्याचा  सुद्धा.....
 आनंदच!
 
दुपारी  जेवणानंतर  पेपर  वाचता वाचता  
लागलेली  डुलकी ...
 परमानंद. !
 
बाहरे छान पाऊस पडतोय.. हवेत हवाहवासा गारवा... 
आणि हाती पडावी गरमागरम भजी..
स्वादानंद!
 
रात्रीची निरव शांतता..
आराम खुर्चीवर डोळे मिटून
पहुडलेल्या क्षणी..
आपली आवडती गझल..
रेडिओने गुणगुणावी...
स्वर्गीय आनंद!
 
एखादी कविता किंवा लेख
आपण पोस्ट करावा..
मित्रांनी त्याला भरभरुन 
दाद द्यावी...
साहित्यानंद!
 
मनातल्या निरनिराळ्या 
शंका कुशंका..
मन अशांत अशांत झालंय
आणि देवघरातल्या भजनामुळे
सारे सांवट दूर व्हावे..
कैवल्यानंद!
 
मित्रांच्या  साठीशांती  समारंभाचा  आनंद...
तिथे  भेटलेल्या  जुन्या  सवंगड्यांमुळे होणारा... 
अपार  आनंद!
 
कधीकाळी सरकारी कृपेने
महागाई भत्त्यात वाढ होऊन तीनचारशे रुपये जास्त पेन्शन हातात पडली की होणारा..
आर्थिक आनंद!
 
सर्वांनी  सारे  सारे  नकारात्मक  विचार  सोडून  दिले  की  मिळणारा.... निर्भेळ  "आनंद"!
 
आणि  या  सर्व  आनंदाची  बेरीज  करून  ती  मनाच्या  कप्प्यात  साठविली  की @acc@ पडल्यापडल्या  लागलेली  शांत  झोप  म्हणजेच... 
*"ब्रह्मानंद" !!! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋतिक सुझैन साथ साथ