Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्हालाही हळदीकुंकू करावसं वाटतं

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (11:39 IST)
मैत्रिणींच्या सहवासात रमावसं वाटतं
आम्हालाही हळदीकुंकू करावसं वाटतं
 
शहरं गेली वाढत, घरं झाली दूर,
भेटीसाठी फेसबुक, व्हॉट्स अप चा टूर
प्रत्यक्षातही कधीतरी भेटावसं वाटतं
 
मिस्टरांचं ऑफिस, मुलांच्या शाळा;
तारेवरची कसरत करून सांभाळायच्या वेळा
स्वत:साठी कधीतरी जगावसं वाटतं
 
काळ धावतो भराभरा, रुटीन झालंय बिझी
जगणं झालय डिफ़िकल्ट काहीच नाही ईझी
काळाला या क्षणभर थांबवावसं वाटतं
 
साड्या पडल्यात कपाटात, अंगावरती ड्रेस
मनगटाला नुस्तं घड्याळ, क्लचरमध्ये केस
दागिने अन साड्या लेऊन मिरवावसं वाटतं
 
तप झालं लग्नाला, संवाद आला सरत
एकमेकांसाठी आता वेळही नाही उरत
उखाण्यात प्रेम व्यक्त करावसं वाटतं
आम्हालाही हळदीकुंकू करावसं वाटतं

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

नवीन

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

Lock Upp 2 Finale: श्रेया कालरा दुसरी फायनलिस्ट ठरली, आकांक्षा चमोलाचा प्रवास संपला

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर घेणार घटस्फोट?

वयाच्या १६ व्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश करून काजोलने यशाचा विक्रम प्रस्थापित केला

पवित्र संगमेश्वर मंदिर, जिथे दोन नद्यांच्या संगमावर इतिहास आणि भक्तीचा एक अनोखा प्रवाह दिसतो

पुढील लेख
Show comments