Marathi Biodata Maker

"सासू"

Webdunia
शनिवार, 7 एप्रिल 2018 (12:39 IST)
सारख्या सूचना देणारी का होईना 
पण सासू सर्वांनाच असावी..
 
कुळाचार शिकवताना हळवी होणारी,
आपल्या संसाराची कहाणी सांगणारी,
तरीही त्यात 'मीपणा' नसणारी, 
प्रेमाने सर्वांना खाऊ घालणारी, 
प्रेमळ सासू सर्वांनाच मिळावी.. 
 
स्त्री म्हणून मर्यादा शिकवणारी, 
चुकलं तर शिक्षिकेसारखी समजावून सांगणारी, 
ह्यात साखर नाही हो, ह्यात गूळ घालायचा, 
त्यात पाणी नाही हो, वाफेवरच शिजवायचा, 
अन्नपूर्णा गृही नंदण्यासाठी तरी, 
सासू प्रत्येकीला मिळावी.. 
 
भाजलं, लागलं तर प्रेमाने फुंकर घालणारी, 
वेळ प्रसंगी, असं चालत नाही म्हणून दटावणारी, 
आईच्या मायेने सुनेला जवळ घेणारी, 
दमलीस का गं.. म्हणून घोटभर चहा देणारी, 
माया आईची, धाक बाबांचा असं अजब रसायन असणारी, 
घरातली करती सासू सर्वांनाच मिळावी.. 
 
प्रेमाचा हा झरा प्रत्येकीच्या वाट्याला येत नाही, 
सासूच्या रूपातील आई सर्वांनाच मिळत नाही, 
असेल पुर्व पुण्याई तरच लाभते छत्रछाया तिची, 
नाहीतर सासरी येऊन, सून कायमची पोरकी.. 
नाहीतर सासरी येऊन, सून कायमची पोरकी..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

नवीन

ए.आर. रहमान यांचे गाणे दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली देणार, टीझर प्रदर्शित

मातृत्व, संघर्ष आणि प्रतिकाराची अंगावर शहारे आणणारी कथा सांगणारा ‘मर्दिनी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या मोठ्या भावावर त्यांच्या वडिलोपार्जित गावात हल्ला, प्रकृती गंभीर

भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या सेटवरील क्रू सदस्याचा मृत्यू, पीडित कुटुंबाला ४० लाख रुपये मिळणार

Rainbow Mountain पृथ्वीवरील एक असा पर्वत जो इंद्रधनुष्यासारखा दिसतो! या रहस्यमय पर्वताबद्दलचे अनोखे सत्य

पुढील लेख
Show comments